Thursday, December 12, 2024
Homeराजकारणशरद पवारांना धक्का भाजपमहायुतीचे 9 उमेदवार विजयी ; कॉंग्रेसची मते फुटली

शरद पवारांना धक्का भाजपमहायुतीचे 9 उमेदवार विजयी ; कॉंग्रेसची मते फुटली

अकोला दिव्य ऑनलाईन : विधान परिषदेच्या निवडणुकीत ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार रिंगणात आल्याने नेमका कोणाचा उमेदवार पराभूत होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर आज झालेल्या मतमोजणीत भाजपमहायुतीचे सर्व 9 च्या 9 उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतील मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. पण शरद पवार यांनी समर्थन दिलेले शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. नेहमी प्रमाणे कॉंग्रेस पक्षाची जवळपास 4 मते फुटल्याने महाविकास आघाडीला तीनपैकी फक्त दोन उमेदवारांना निवडुनआण्यात यश आले आहे. यामध्ये सुरुवातीच्या कलामध्ये मिलिंद नार्वेकर यांना आघाडी पाहायला मिळाली, मिलींद नार्वेकर यांचा अखेर २३ मतांनी विजय झाला आहे. पण शेकापचे जयंत पाटील यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले जयंत पाटील यांना १२ मते पडली तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना तब्बल २५ मते पडली.

भाजपचे पाच पैकी पाच उमेदवार निवडुन आले आहेत. पाच वर्षांनंतर पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा आमदारकी मिळाली आहे, तब्बल पंकजा यांच्या पारड्यात २६ मते पडली आहेत. तर योगेश टिळेकर यांना २३ मते मिळाली आहेत. परिणय फुके यांना २६ मते मिळाली, अमित गोरखे यांना २६ मते, सदाभाऊ खोत यांना २४ मते म्हणजे एकंदरीत भाजपच्या उमेदवारांना भरभरुन मते मिळाली आहेत.दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार जिंकले आहेत. यामध्ये राजेश विटेकर यांना २३ मत मिळाली आहेत तर शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळाली आहेत. शिंदे यांचे सुद्धा दोन्ही उमेदवार जिंकले आहेत यामध्ये भावना गवळी यांना २४ मते मिळाली आहेत आणि कृपाल तुमाने यांना २५ मते पडली आहेत यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेच्या निकालात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे असलेले उमेदवार जयंत पाटील शेकापचे यांचा मात्र पराभव झाला. म्हणजेच काय तर विधानपरिषदेच्या जमागोळा बेरेजेत काकांना यंदा पुतण्या भारी पडलेला चित्र दिसते, शरद पवारांचा उमेदवाराला महायुतीने पराभवाची धूळ चारली इतकेच नव्हे तर काँग्रेसची काही मत फुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!