Saturday, December 14, 2024
Homeइतिहास३५ वेळा अपयश पण अखेर 'आयएएस'ची स्वप्नपूर्ती ! विजय वर्धन...

३५ वेळा अपयश पण अखेर ‘आयएएस’ची स्वप्नपूर्ती ! विजय वर्धन यांची प्रेरणादायी गोष्ट

अकोला दिव्य ऑनलाईन : अनेकदा अपयश पदरात पडले.पण न खचून न जाता अथक परिश्रमाने वाटचाल सुरू ठेवली तर शेवटी उद्देश वा स्वप्नपूर्ती निश्चितच आहे. हे हरियाणातील विजय वर्धन यांनी दाखवून दिले.अनेकदा सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिली; पण ते वर्धन उत्तीर्ण झाले नाहीत. पण, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशातील सर्वांत कठीण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. अपयशाची अनेक कडू फळे खाल्ली असली तरी आपणही यशाचे सर्वांगसुंदर गोड फळ मिळवून, प्रत्यक्षही ते खाऊ शकतो हे त्यांनी याद्वारे दाखवून दिले. त्यामुळे त्यांनी स्वतःवरील विश्वास दृढ झाला. आज विजय वर्धन हे आयएएस अधिकारी झाले आहेत.

आयएएस अधिकारी विजय वर्धन यांचा जन्म हरियाणातील सिरसा येथे झाला. त्यांनी हिसार येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी ते दिल्लीला गेले. एक-दोन नव्हे, तर जवळजवळ ३५ वेळा सरकारी नोकरीसाठी ते परीक्षेला बसले; पण एकही परीक्षा पास होऊ शकले नव्हते.मात्र अखेर २०१८ मध्ये त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि १०४ वा क्रमांक पटकवला.

दोन वेळा दिली यूपीएससीची परीक्षा :
२०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेत विजय वर्धन यांनी १०४ वा क्रमांक पटकावल्यामुळे त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. पण, त्यांचे स्वप्न आयएएस अधिकारी बनण्याचे असल्याने ते समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी २०२१ मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि ७० वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न यशस्वीरीत्या पूर्ण केले. विजय वर्धन यांनी २०१८ आणि २०२१ अशी दोन वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

अपयश स्वीकारून, त्यापासून पुढे जाण्यावर भर दिला आणि निष्ठा व प्रामाणिकपणे काम करीत निकराने परिस्थितीशी लढत राहिले, तर यश नक्कीच मिळू शकते. याबाबतचे उत्तम उदाहरण आज आपल्याला विजय वर्धन यांच्या रूपानं पाहायला मिळालं आहे. जिथे काही व्यक्ती एक-दोन परीक्षांमध्ये नापास झाल्यावर निराश होतात, तिथे विजय वर्धन यांची चिकाटी हे दाखवून देते की, अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. वारंवार अपयशी होण्यापासून ते स्वप्न साकार करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतो आहे.

फोटो सौजन्य: एक्स / @Wardhan_IAS)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!