Saturday, September 21, 2024
Homeगुन्हेगारीअकोला : 6 विद्यार्थ्यांनीसोबत विकृत कृत्यं ! आरोपी प्रमोद सरदारला अटक

अकोला : 6 विद्यार्थ्यांनीसोबत विकृत कृत्यं ! आरोपी प्रमोद सरदारला अटक

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मतदारसंघातील बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने शाळेतील 6 मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार आता उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार (48) विरुद्ध बी एन एस व पॉक्सो अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात करुन आरोपी शिक्षक सरदारला तातडीने अटक करण्यात आली. या घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काजीखेड गावातील अकोला जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता 8 वीत शिकणाऱ्या मुलींचा गेल्या चार महिन्यांपासून विकृत मानसिकता असलेला हा शिक्षक छळ करत होता. विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून मुलींच्या अंगाला वाईट स्पर्श करत होता. त्याच प्रमाणे अश्लील गप्पा ही मारायचा.याबाबतत कुणाला काहीही सांगितले तर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. उलटपक्षी मी शिक्षक असून माझ्यावर विश्वास आहे. मी तुम्हाला बदनाम करणार, अशी धमकी दिली होती. जीवन बरबाद होईल या भीतीने मुली गप्प बसून राहिल्या. मात्र त्रास असहय्य झाले. दरम्यान बदलापूर येथे आंदोलन होत असताना पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितले आणि प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आले आहे.

पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षक सरदारविरोधात तक्रार दाखल केली. यासोबतच पिडीत सहा विद्यार्थ्यांनीचे सविस्तर बयान सुद्धा घेण्यात आले आहेत. या प्रकरणी उरळ पोलिसांनी तातडीने शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील केली आहे. या संतापजनक घटनेचे माहिती मिळताच उरळ पोलिसांनी कोणत्याही क्षणाची वाट न पाहता तात्काळ आरोपी शिक्षकाला अटक केली हे विशेष.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!