Saturday, September 21, 2024
Homeसामाजिकराज्यातील प्रत्येक गावात, वस्तीत अभ्यासिका निर्माण करा - शंकर कंकाळ

राज्यातील प्रत्येक गावात, वस्तीत अभ्यासिका निर्माण करा – शंकर कंकाळ

अकोला दिव्य ऑनलाईन : राज्यातील मागास व अती मागास वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण करताना स्पर्धापरीक्षा आणि त्याची तयारी करण्यासाठी प्रत्येक गावात आणि वस्तीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका निर्माण व्हावी, यासाठी शासनाने प्रति अभ्यासिका आणि संविधान सभागृहासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करून हा निधी राखीव ठेवावा अशी मागणी मिशन अभ्यासिका महासंघाचे संस्थापक शंकर कंकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्र राज्यातील गावामध्ये प्रत्येक वस्त्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी २ मजली डिजिटल अभ्यासिकासाठी गावं, शहर व प्रत्येक वस्त्यांमध्ये शासनाने ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका व महानगर पालिका क्षेत्रात ५० लाख रुपये निधी राखीव ठेवून तो निधी देऊन त्वरित उपलब्ध करून द्यावा. संविधान सभागृहात अभ्यासिकासह बांधकाम करून द्यावे. या मागणीसाठी २३ सप्टेंबर रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती शंकर कंकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी पवन कनोजीया, रेखाताई घरडे , आनंद मानकर बाळासाहेब इंगळे, हरनामसिंग रोहेल,अमन घरडे, संतोष वैद्य यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!