Saturday, October 5, 2024
Homeताज्या बातम्याअकोला शहर काँग्रेसचे आंदोलन ! राहुल गांधींना धमकी देणा-या भाजप माजी...

अकोला शहर काँग्रेसचे आंदोलन ! राहुल गांधींना धमकी देणा-या भाजप माजी आमदाराला अटक करा

अकोला दिव्य ऑनलाईन : देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे बळी घेतले असून आता पुन्हा एक गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली गेली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचा माजी आमदार तरविंदर सिंह मारवाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मात्र भाजपचे सरकारनं त्यावर काहीही कारवाई केली नाही. हे अत्यंत आक्षेपार्ह असून या विरोधात आज अकोला शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करुन भाजपचा धिक्कार करण्यात आला.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमकी देणारं माजी आमदार तरविंदर सिंह मारवा यांच्या वक्तव्याने भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजपाला गांधी नावाची ऍलर्जी आहे. मोदींपासून सर्वच नेते राहुल गांधी यांची सातत्याने बदनामी करतात. आता तर भाजपाने सर्वच मर्यादा सोडल्यात. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाणिवपूर्वक चुकीचा अर्थ काढून लोकांची माथी भडकवण्याचा प्रकार भाजप करीत आहे. राहुल गांधी यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सारखेच मारु, अशी धमकी दिली जात आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आणि आजही गांधी कुटुंबाच्या जीवाला धोका आहे मात्र राहुल गांधी जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेचा आवाज उठवित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शहर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांनी केली.

आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ प्रशांत पाटील वानखडे, प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, मनपा माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, कपिल रावदेव, प्रशांत प्रधान, तपस्यू मानकीकर, पंकज देशमुख, पंकज राठी, आकाश कवडे, अभिजित तवर, पूजा काळे, अर्जुन थानवी, तश्वर पटेल, अब्दुल्ला, प्रदीप वखारीया यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!