अकोला दिव्य ऑनलाईन : संपूर्ण देशभरात 89 व महाराष्ट्रात मागील 62 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय अखिल भारतीय मारवाडी संमेलनाचा महाराष्ट्र प्रांतीय कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उद्या रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता अकोला येथील खंडेलवाल भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात मारवाडी संमेलनाची प्रदेश कार्यकारणी आपला पदभार स्वीकारणार आहे. माजी कॅबिनेट मंत्री व मारवाडी संमेलनाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश मुंदडा यांच्या अध्यक्षतेत या सोहळ्याचे उद्घाटन माजी कॅबिनेट मंत्री व संमेलनाचे माजी अध्यक्ष रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. या सोहळ्यात यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.अनुप धोत्रे, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, संमेलनाचे राष्ट्रीय संघटन मंत्री वीरेंद्रप्रकाश धोका, माजी आमदार बबनराव चौधरी, मारवाडी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष कैलास राठी, राजस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल उपस्थित राहणार आहेत. पदग्रहण सोहळ्यात महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनांचे नवीन प्रांतीय अध्यक्ष निकेश गुप्ता अध्यक्षपदाचा व प्रांतीय महामंत्री सुदेश करवा जालना महामंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
कार्यकारणीतील उपाध्यक्ष महेश बंग नागपूर, मदन मालपाणी मलकापूर, उमेश पंचारिया जालना, गंगाबिसन कांकर नांदेड, सुनील खाबिया मुंबई, किशोर जैन रायगड, विनोद काकानी इचलकरंजी, कोषाध्यक्ष शैलेंद्र कागलीवाल अकोला, संयुक्त मंत्री भरत गुर्जर मुंबई, अँड. मुकेश गोयनका संभाजीनगर,श्रीनिवास पांडे नांदेड, संघटन मंत्री सिद्धार्थ रुहाटीया अकोला, सुनील राठी जालना, सहमंत्री लक्ष्मीनारायण मानधना जालना, निलेश अग्रवाल अकोला, पवन जोशी जालना, सहायक मंत्री मनोज अग्रवाल शेलु बाजार, संजय मंत्री संभाजीनगर, श्रीनिवास सोनी उदगीर, जनसंपर्क अधिकारी मनीष तवसवाला जालना, प्रचार मंत्री संतोष छाजेड अकोला हे देखील पदभार स्वीकारणार आहेत.
महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा सर्वात प्रथम मध्य प्रांताचे पहिले अर्थमंत्री, भारतीय घटना समितीचे सभासद व अकोल्याचे सुपुत्र विदर्भ केसरी स्व. ब्रजलालजी बियाणी यांनी सांभाळली. त्यानंतर अकोला येथील माजी मंत्री स्व. जमनलाल गोयनका, नागपूर येथील माजी मंत्री मदनगोपाल अग्रवाल, लक्ष्मीनारायण राठी पुणे, बसमतचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी मंत्री रमेशचंद्र बंग नागपूर तथा माजी मंत्री राज के पुरोहित मुंबई यांनी सांभाळली. तब्बल 45 वर्षानंतर निकेश गुप्ता यांच्या रूपाने अकोला जिल्ह्याला अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.
पदग्रहण सोहळ्यात समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन नूतन प्रांतीय अध्यक्ष निकेश गुप्ता, महामंत्री सुदेश करवा, मारवाडी संमेलनाचे शाखाध्यक्ष अँड.सुरेश अग्रवाल, युवा मंच शाखाध्यक्ष रोहित रुंगटा यांनी केले आहे.