Saturday, October 5, 2024
Homeताज्या बातम्याधक्कादायक ! कॅडबरी चॉकलेटमध्ये जिवंत अळी ; दक्षता घेणे महत्वाचे : ग्राहकांमध्ये...

धक्कादायक ! कॅडबरी चॉकलेटमध्ये जिवंत अळी ; दक्षता घेणे महत्वाचे : ग्राहकांमध्ये खळबळ माजली

अकोला दिव्य ऑनलाईन : ‘कॅडबरी चॉकलेटची गुणवत्ता आणि सुरक्षितता यावर विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक घटना उघडकीस आल्याने ग्राहकांमध्ये खळबळ माजली आहे. पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी यासंबंधित ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्विट करीत त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये जिवंत अळी चॉकलेटमध्ये रेंगाळताना दिसत आहे. यासंबंधांने कंपनीकडे तक्रार केली असता कंपनीने, ‘पुढच्या वेळेस अशी घटना घडल्यास आमच्या पत्त्यावर ती कॅडबरी पाठवा’ असे उत्तर दिले आहे.असे अक्षय जैन यांनी अकोला दिव्य सोबत बोलताना सांगितले. प्रसिद्ध चाकलेट कंपनी ‘कॅडबरी डेअरी मिल्क’च्या चॉकलेटमध्ये याआधीही अळी सापडल्याचे प्रकार घडले आहेत. यानिमित्ताने खाद्यपदार्थाची गुणवत्ता व एक्स्पायरी डेटचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याने ग्राहकांनी दक्षता घेणे महत्वाचे आहे .

अक्षय जैन यांनी ‘कॅडबरी टेंटेशन्स रम आणि मनुका प्रीमियम चॉकलेट बार’ ही कॅडबरी मागवली होती. त्यांनी ती खाण्यासाठी रॅपर उघडले असता त्यामध्ये दोन अळ्या आढळून आल्या. त्यानंतर अक्षय जैन यांनी त्याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ कंपनीला पाठवत नाराजी व्यक्त केली आहे. अक्षय जैन यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कॅडबरी चॉकलेटमध्ये अळी आढळल्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू असताना, आणखी अभिनंदन रिसबूड या व्यक्तीने चॉकलेटचा फोटो शेअर करत त्याच्याकडच्या चॉकलेटमध्येही अळी सापडल्याचे सांगितले आहे.

खेद आहे की आमच्या उत्पादनांमध्ये… 

या प्रकरणावर कॅडबरीने म्हटले की, आम्हाला खेद आहे की आमच्या उत्पादनांमध्ये असा अनुभव आला. कृपया भविष्यात असे काही आढळल्यास, आम्हाला ते चॉकलेट आणि त्यामध्ये सापडलेले पदार्थ पाठवा. तुमच्या समस्येचे निराकरण करू. कंपनीच्या या उत्तरावर अक्षय जैन यांनी नाराजी व्यक्त केली,  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!