अकोला दिव्य ऑनलाईन : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, नितीन महाराष्ट्र काँग्रेस सोशल मीडिया प्रभारी नितीन अग्रवाल यांच्या मान्यतेने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या अकोला जिल्हा अध्यक्षपदी भूषण ताले पाटील यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
भूषण ताले यांची पहिल्यांदा नियुक्ती २०१८ साली अशोक चव्हाण यांच्या काळात झाली होती.त्यानंतर बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांच्या काळातही कयम होती. सलग ६ वर्षापासून ते सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी कायम असून त्यांच्या सक्रिय कार्यामुळे प्रत्येक प्रदेश अध्यक्षांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
भूषण ताले आपल्या नियुक्तीचे श्रेय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव खा. मुकुल वासनिक, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आ.यशोमती ठाकूर, सोशल मिडियाचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, माजी अध्यक्ष अभिजित सपकाळ, प्रदेश प्रवक्ते डॉ.सुधीर ढोणे यांना देतात.