Thursday, December 12, 2024
Homeराजकारणआंबेडकरांना अकोला पश्चिममध्ये मोठा झटका ! जिशान हुसेन यांनी उमेदवारी मागे घेतली

आंबेडकरांना अकोला पश्चिममध्ये मोठा झटका ! जिशान हुसेन यांनी उमेदवारी मागे घेतली

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र डॉ.जिशान हुसेन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अँड प्रकाश आंबेडकर यांना हा मोठा धक्का बसला असून कॉंग्रेस उमेदवार साजीद खान पठाण यांना यामुळे मोठा दिलासा देखील मिळाला आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा अँड प्रकाश आंबेडकर यांचा उमेदवार मैदानात नाही. डॉ. जिशान हुसेन यांनी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवून घेण्यासाठी निकराने प्रयत्न केले होते. मात्र उमेदवारी मिळाली नाही. तेव्हा त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पहिल्या दिवसापासून मनात शंकेची पाल चुकचुकली होती.

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात माजी आमदार अनिस अहमद यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळवून घेतली.पण अवघ्या १ मिनीटाचा उशीर झाला आणि ते अर्ज दाखल करू शकले नाही.तर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात डॉ. हुसेन यांनी चक्क उमेदवारी दाखल करुन, अँड. आंबेडकर यांना दुसऱ्या उमेदवाराची संधी दिली नाही. हा कॉंग्रेस पक्षाचा मोठा गेम प्लान होता. ही बाब आज स्पष्ट झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!