Thursday, December 12, 2024
Homeआरोग्यअकोल्याचा AQI 107 वर ! चिंताजनक आहे अकोल्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक ;...

अकोल्याचा AQI 107 वर ! चिंताजनक आहे अकोल्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक ; प्रदूषण कार्यालयाचा निकष

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहरात वायू प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतच चालले असून ऑक्टोबर महिन्यात शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 107 वर (एक्यूआय) म्हणजे धोक्याचा पातळीवर गेला असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी अकोल्याचा AQI 107 वर नोंदवला गेला, जो प्रदूषण नियंत्रण कार्यालयाने इंग्रजीत नोंदवला. त्यामुळे अकोल्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक ‘निकृष्ट दर्जा’च्या श्रेणीत आहे. तेव्हा बाहेर पडताना आपल्या फुफ्फुसांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

एकीकडे थंडीची आणखी एक लाट हळूहळू वाढत असताना, दुसरीकडे प्रदुषण पसरवून धावणारी वाहने, कचरा जाळून केलेल्या शेकोटीतून निघणारा धुराळा आणि फोडलेल्या फटाक्यांमधून निघालेला धुर यामुळे अकोल्यातील हवेचा दर्जा निर्देशांक चिंताजनक स्थितीत पोहोचला आहे.कोरोना सारख्या गंभीर श्वसनाच्या आजारामुळे अनेकांची फुफ्फुसे बाधित झाल्याची सूचना दिली जाते आहे.

दरम्यान, दिवाळीच्या दिवशी कोट्यवधी रुपयांचे फटाके फोडून जळाले आहेत, धूरफटक फटाक्यांमुळे फुफ्फुसाचा त्रास वाढतो. दुसरीकडे रस्त्यावर कचरा जाळल्याने श्वसनाचे आजारच नव्हे तर कर्करोगासारखे आजारही वाढण्याचा धोका आहे.याबाबत मनपा प्रशासनालाही डॉक्टरांकडून कळवण्यात आले, तरीही शहरात खुलेआम कचरा जाळला जातो आहे.अशा परिस्थितीत अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.

प्रदूषण नियंत्रण कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, केवळ फटाक्यांमुळेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला आणि रस्त्यांवर उघड्यावर कचरा जाळल्यामुळेही हवेचे प्रदूषण वाढत आहे. त्यात प्लास्टिक असल्याने धोका आणखी वाढतो. तर दुसरीकडे ग्रामीण भागातही काढणीनंतर उरलेला कचरा जाळला जातो, त्यामुळे प्रदूषण वाढते. शहरी भागात वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यातील बहुतांश वाहने पेट्रोल आणि डिझेलवर चालतात. अनेक सार्वजनिक आणि खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांची देखभालही नीट केली जात नाही. त्या वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे हवेची गुणवत्ता बिघडत असून, नागरिकांच्या फुफ्फुसासाठी ते अत्यंत घातक आहे. रस्त्यांवर साचलेल्या धुळीमुळे श्वसनाचे आजारही होतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!