Thursday, December 12, 2024
Homeराजकारणअकोल्यात मोदींनी केला खोटा दावा ! BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर...

अकोल्यात मोदींनी केला खोटा दावा ! BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर नाही.

BHIM UPI Narendra Modi Claims its Related to Narendra Modi : अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला येधील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केला आहे की आपल्या देशात मोबाइलद्वारे पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी सुरू केलेल्या प्रणालीला म्हणजेच युपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) प्रणालीला आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानेच भीम यूपीआय (BHIM UPI) असं नाव दिलं आहे. मात्र मोदी यांचा हा दावा शिवसेनेने (ठाकरे) खोडून काढला आहे. शिवसेनेचे (ठाकरे) विधान परिषद सदस्य व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की, भीम यूपीआयच्या संकेतस्थळावरून कुठेही सांगितलेलं नाही की या नावाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा काही संबंध आहे.

अकोला येथील जाहीर सभेत नरेंद्र मोदी म्हणाले, जगाने नव्या डिजीटल चलनाचा स्वीकार केला आहे. पूर्वी जग चामड्याच्या नोटा वापरत होतं. फार पूर्वीच्या काळात दगडाची नाणी व चलनाचा वापर केला जात होता. त्यानंतरच्या काळात तांब्यासह वेगवेगळ्या धातूंची नाणी अस्तित्वात आली. त्यानंतर कागदी चलन अस्तित्वात आलं. चलनामध्ये सातत्याने बदल होत गेले. आज जगभरात डिजिटल चलनव्यवस्था आहे. आपल्या देशाने यूपीआय (Unified Payments Interface) या डिजीटल चलनव्यवस्थेचा अवलंब केला आहे. यूपीआय हा डिजिटल चलनव्यवस्थेतील एक प्रकार आहे. याद्वारे आपण सर्वजण मोबाइलद्वारे पैशांची देवाण-घेवाण करू लागलो आहोत.

पंतप्रधान मोदींचा दावा काय?

पंतप्रधान मोदी यांनी सभेला उपस्थित लोकांना विचारलं की तुम्हाला माहिती आहे का आपण या डिजिटल चलनाचे नाव काय ठेवलं आहे? हा मोदी आहे… या मोदीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा आहे. म्हणूनच आम्ही या चलनाला भीम यूपीआय असं नाव दिलं आहे. जेणेकरून भविष्यात जेव्हा संपूर्ण देश या डिजिटल चलनाचा, डिजिटल ट्रान्जॅक्शनचा वापर करू लागेल किंवा प्रत्येक जण भीम यूपीआयचा वापर करत असेल, तेव्हा प्रत्येकाला बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येईल. प्रत्येकाला जाणीव होईल की हे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

https://x.com/iambadasdanve/status/1855152488720048550

शिवसेनेने (ठाकरे) दावा असा खोडून काढला?

दरम्यान, मोदी यांनी दावा केल्यानंतर अंबादास दानवे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर भीम यूपीआयच्या संकेस्थळावरील माहितीचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये कुठेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख नसल्याचं दानवे यांनी सांगितलं आहे. तसेच त्यांनी म्हटलं आहे की “BHIM UPI चे नाव बाबासाहेबांच्या नावावर ठेवलंय अशी अजून एक बतावणी पंतप्रधान मोदींनी अकोल्यात केली. मोदीजी, याचा फुलफॉर्म हा BHARAT INTERFACE FOR MONEY हाच आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिला आहे. इथे तर बाबासाहेबांचे नाव कुठेच नाही! हे खोटं बोलून आमचे दलित बांधव भुलणार नाहीत! हे घ्या पुरावा…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!