Thursday, December 12, 2024
HomeUncategorizedबाळासाहेब आंबेडकरांची ताकद दाखवून देण्याची हीच खरी वेळ - आलिमचंदानी

बाळासाहेब आंबेडकरांची ताकद दाखवून देण्याची हीच खरी वेळ – आलिमचंदानी

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला भाजपात मागील कित्येक वर्षे काम केल्यावरही माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा भाजपात योग्य सन्मान होत नाही. मात्र वंचित बहुजन आघाडीचे सर्वोच्च नेता अँड. बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्यावर ठेवून त्यांनी संपूर्ण ताकद माझ्या मागे उभी केली आहे. आता हीच खरी वेळ आहे की वंचितच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची ताकद दाखवून द्यावी, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार हरिश आलीमचंदानी यांनी कैलास टेकडी, खदान येथील बुद्ध विहारात उपस्थित जनसमुदायाला केले.

वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केल्याने हरिश आलीमचंदानी यांची ताकद डबल झाली आहे त्यामुळे विजय आपलाच आहे. तेव्हा येत्या २० नोव्हेंबर रोजी आंबेडकरवादी मतदार आणि कार्यकर्त्यांनी १०० टक्के मतदान करून विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे, हरिश आलीमचंदानी म्हणाले. संध्याकाळी उशिरा सुरु झालेल्या या जन सभेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,कार्यकर्ते कुठल्याही परिस्थिती मध्ये १०० टक्के मतदान करुन घेणार असून ही आता काळाची गरज आहे.

पश्चिम विधानसभा मतदारसंघात आलिमचंदानी यांच्या झंझावाती प्रचार आणि मतदारांच्या वाढत्या पाठिंब्यावर विरोधी उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या दरम्यान वाठूरकर लेआऊट, कौलखेड येथील शिवशक्ती प्रतिष्ठान, पावसाळे लेआऊट, निवारा नगर, कैलास टेकडी, राधे नगर, हनुमान बस्ती इत्यादी भागात मतदारांनी स्वयंस्फूर्त स्वागत करुन, आशिर्वाद दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!