Thursday, December 12, 2024
HomeUncategorizedविजय अग्रवाल यांचा विविध भागात संवाद दौरा ! परिपूर्ण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची...

विजय अग्रवाल यांचा विविध भागात संवाद दौरा ! परिपूर्ण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही

अकोला दिव्य ऑनलाईन : शहरातील पोळा चौक येथे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांनी संवाद बैठक घेऊन नागरिकांशी सुसंवाद साधत आशीर्वाद घेतले. यावेळी या भागात केलेल्या विकासकामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या भागांमध्ये अनेक विकासकामे पूर्णत्वास आणली असून येणाऱ्या काळातही येथील परिपूर्ण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी अग्रवाल यांनी दिली.

याप्रसंगी दिलीप मिश्रा, नितीन ताकवले,रमेश गावंडे, बंडू मालगे, रमेश मेहरे, राजेश्वर फाले, योगेश धनोकार, राजेश धनोकार, प्रदीप बनवे, वामनराव मुळे, छोटू सरदार, सुभाष वानखडे, यश जाधव, शिव ढवळे, उमेश गुजर, युवराज राठोड, अमोल गोगे, यश दांगला, रमेश पाचपोर, सुशील महोरे, किशोर गायकवाड, चेतन साहू, दिलीप नायसे, करण साहू, अरविंद शुक्ला, राजेश पंढरी, प्रवीण झापर्डे, आशिष पंजवानी व महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संवाद दौऱ्यानिमित्त भाजपा महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल रवी नगर येथील नागरिकांशी संवाद साधताना पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये विकासपर्व अखंडित ठेवण्यासाठी 20 नोव्हेंबरला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी श्रीरंगदादा पिंजरकर, सुमनताई गावंडे, बादल सिंग ठाकूर, विजय इंगळे, गजानन पावसाळे, बिलल परेल, पप्पू चौधरी, संतोष अनासने संदीप पत्की, स्वप्निल देशमुख, कुणाल शिंदे, सुनील मदनकार, अरविंद शुक्ला, कुणाल पिंजरकर, नितीन देशमुख, सचिन कराडे, आदी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधी कॅम्प येथे संवाद दौऱ्यानिमित्त विजय अग्रवाल यांनी भेट दिली येथील नागरिकांशी संवाद साधला.अकोल्याच्या प्रगतीसाठी नवीन योजनांचा संकल्प केला. हरिहर पेठ येथे नागरिकांनी भाजपवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. यावेळी, महिला व तरुणांनी विकासाच्या उपक्रमांसाठी सहकार्याचे वचन दिले. भाजप हाच विकासाचा खरा मार्ग आहे, असे सांगत त्यांनी आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी सिद्धार्थ वरोठे, सुजित ठाकूर, संजय बडोणे, विनोद मनवानी पुरुषोत्तम पानझडे, सुनील उगले, पवन महल्ले, महेंद्र गोटखडे अरविंद शुक्ला, प्रीतम ठाकुर, प्रवीण पळसकर, हिरा गायधने, अक्षय गायकवाड, दीपक शिरस्कार हर्ष मांडलेकर, आशिष वाघवाणी सागर बनसोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!