Thursday, December 12, 2024
HomeUncategorizedमहायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी(अजित पवार) पक्षाची संवाद बैठक

महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी(अजित पवार) पक्षाची संवाद बैठक

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची संवाद बैठक आज हॉटेल मीरा येथे पार पडली. या बैठकीला महायुतीच्या घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय अग्रवाल यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.

बैठकीत निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात आणि प्रचाराची तयारी व कार्यक्षेत्राची आखणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या पक्षांमध्ये सामूहिक एकतेची महत्त्वाची भूमिका उचलली. या बैठकीमुळे महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये ऊर्जा व उत्साह निर्माण झाला, जो होऊ घातलेल्या निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

याप्रसंगी उमेदवार विजय अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महानगर अध्यक्ष विजय देशमुख, भाजपा महानगराध्यक्ष जयंतराव मसने, दिलीप देशमुख, गौतम गवई, अजय रामटेके, मनोज गायकवाड, यश साहू, दिलीप मिश्रा, सुधीर कहाकर, संतोष डाबेराव, मुन्ना ठाकूर,अनिल मालगे, आकाश इंगळे ,अशोक परळीकर, फराज खान, नकीर खान, वैभव घुगे, रहीम पेंटर, अजय मते, याकूब पहेलवान नितीन शिरसागर अक्षय झटाले सोनू इंगळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!