Thursday, December 12, 2024
HomeUncategorizedमग ते ‘व्होट जिहाद’ नव्हते का ? उलेमा, मौलवींनी भाजपला जाहीरपणे पाठिंबा...

मग ते ‘व्होट जिहाद’ नव्हते का ? उलेमा, मौलवींनी भाजपला जाहीरपणे पाठिंबा दिला होता ना !

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : आरोप प्रत्यारोप हा राजकारणाचा भाग आहे. त्यात गैर किंवा चुकीचं नसलं तरी आरोपांमध्ये काही ना काही सत्यता असायला हवी. आरोपांच्या उत्तरात काही प्रमाणात तथ्य असायला हवे आणि या आरोप-प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य माणसांचं आणि राज्य वा देशाचं हित असावं असं वाटत नाही का ! दुर्दैवाने अलिकडच्या काळात राजकारणाचा भाग असलेले आरोप प्रत्यारोप हे विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचे हत्यार म्हणून वापरले जाते आहे.यासाठी हत्यारावरावर बेमालूमपणे असत्याचा मुलामा चढवून त्याची धार एवढी धारदार केल्या जात आहे की, समाजास समाजात द्वेषाची पेरणी होते. द्वेषाच्या पिकाला आलेल्या फळातून मग सत्तेची चव येते.. आजच्या काळात याला आपण भाजपाचे ‘सत्ता जिहाद’ म्हटलं तर वावगं ठरणार !

आपलं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं बघावं वाकून, हे राजकारणाचं नवं तत्वज्ञान आहे.आता निवडणूक काळात एवढे खोटं बोलल्या जात आहे की मने कलुशित होते आहे. संपूर्णपणे खोटे बोलून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. भविष्याचा वेध चुकत असून, नवीन पिढीच्या पुढ्यात आम्ही काय वाढून ठेवत आहे ? याच नेत्यांना विशेषतः भाजपला तर भान नाहींच नाही. बगलबच्चे व समर्थकांची तर विचारता सोय नाही. कोणाचं आणि कोणत्या गोष्टीसाठी समर्थन करतो, ते पटवून देण्यासाठी कुठलं उदाहरण देतो, यांच काहीही तारतम्य बाळगत नाही. आपल्यासोबत सर्वसामान्य माणसाच जीवन खरंच सुसह्य झाला आहे की अजून खडतर झाले आहे की काय ? हे देखील त्यांच्या ध्यानात का येतं नाही !

संग्रहित छायाचित्र :

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचा संग्राम सुरू असून उलेमांनी पाठिंबा दिला म्हणून काँग्रेसवर ‘व्होट जिहाद’चा आरोप करणाऱ्या भाजपला लोकसभा तसेच आसाम आणि गुजरातमधील निवडणुकांमध्ये उलेमा, मौलवींनी जाहीरपणे पाठिंबा दिला होता मग ते ‘व्होट जिहाद’ नव्हते का, असा थेट सवाल उभा राहिला आहे. नागरी संघटनांच्या कार्यकर्त्यांना ‘शहरी नक्षलवादा’ची उपमा दिली जाते पण २०१२ ते २०१४ या काळात याच कार्यकर्त्यांनी भाजपला मदत केली होती तेव्हा ते कसे चालले, अशीही विचारणा मतदारांनी करायला हवी ना?

विधानसभा निवडणुकीत उलेमा कौन्सिलने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे अन्य नेतेमंडळी काहूर माजवत आहेत. पण गुजरात आणि आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये उलेमा आणि मौलवींनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी मुस्लिमांनी भाजपला पाठिंबा दिला होता. उत्तर प्रदेशात पसमंद मुस्लिमांचा पाठिंबा घेण्यात आला. भाजप परिवारातील नेते इंद्रिस यांनी मुस्लीम समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. आसाममध्ये अलीकडेच मदरशांमधील ५०० उलेमांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला तर ‘व्होट जिहाद’ मग याच मंडळींनी निवडणुकीत पाठिंबा दिला ते भाजपला कसे चालते !

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या नागरी संघटनांच्या (सिव्हिल सोसायटी) कार्यकर्त्यांवर शहरी नक्षलवादाचा शिक्का मारण्यात आला. २०१२ ते २०१४ या काळात याच नागरी संघटनांनी भाजपला मदत केली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला रा. स्व. संघाने सारी रसद पुरविली होती हे स्पष्ट झाले होते. तेव्हा नागरी संघटना या शहरी नक्षलवादी नव्हत्या. भाजपला पाठिंबा देणाऱ्या नागरी संघटनांबद्दल फडणवीस का बोलले नाहीत ? ‘व्होट जिहाद’ आणि शहरी नक्षलवाद यावरून भाजपची दुटप्पी भूमिका लक्षात घेणे आवश्यक व गरजेचे आहे. भाजपच्या या दुप्पटी भुमिकेच्या विरोधात कदाचित महाराष्ट्रातून ठिणगी पडू शकते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!