Thursday, December 12, 2024
HomeUncategorizedग्रुप एडमीन सावधान !निवडणूक आयोग करणार कडक कारवाई ! दोन वर्षापर्यंत तुरुंगवास...

ग्रुप एडमीन सावधान !निवडणूक आयोग करणार कडक कारवाई ! दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड

अकोला दिव्य ऑनलाईन : राज्यात बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी होणार असलेल्या मतदानासाठी शांतता कालावधी सुरू झाला असून या काळात मतदान संपेपर्यंत अर्थात उद्या बुधवार २० नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता पर्यंत दृकश्राव्य माध्यमे जसे की टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया यावर प्रचाराच्या शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार आणि प्रसारावर पुर्णपणे बंदी घातली आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग करणार कडक कारवाई करणार आहे. दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

प्रथमदृष्ट्या ग्रुप एडमिनला यासाठी जबाबदार धरण्यात येईल. जर एखाद्याने निवडणूक आयोग वा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना अशा पोस्ट असलेलं ग्रुप दाखवून लेखी तक्रार केली तर कारवाई निश्चित आहे.

* जाहिरात पूर्व प्रमाणिकरण समितीची मान्यताप्राप्त जाहिरात*

लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२६ अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत. निवडणूक प्रचाराच्या शांतता काळामध्ये मुद्रीत माध्यमांमध्ये छापण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीस जाहिरात पूर्व प्रमाणिकरण समितीची मान्यता असल्याशिवाय या जाहिराती वृत्तपत्रामध्ये छापू नये, अशा आयोगाच्या सूचना आहेत. दृकश्राव्य माध्यमे जसे की टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया यावर प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहीरातीना देखील पोस्ट करण्यास मनाई आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!