अकोला दिव्य ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय आजी आजोबा दिनाचे औचित्य साधून रामदास पेठ मधील सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये आजी आजोबांचे तिलक पूजन व स्वागत करून आजी-आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी अनुश्री शर्मा, पुर्वी जयस्वाल, तनुश्री तायडे, रिशिका जाधव, श्रुतिका जवरकर, स्वरा मुरूमकर, व वेदश्री मानकर या विद्यार्थिनींनी मराठमोळ्या वेशामध्ये आजी आजोबांचे तिलक पुजन केले. स्वागतासाठी प्रवेश द्वारवर मेघा शर्मा, श्रावणी मोहोड , सुषमा देशमुख व आगरकर मॅडम यांनी आकर्षक रांगोळी काढली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी बहुउद्देशीय संस्थेचा आधारवड आणि अनुभवश्रेष्ठ श्रीमती गोदावरीबाई राजपूत होत्या. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रदिपसिंह राजपूत, प्राचार्या मनिषा राजपूत तर आजी आजोबामधून प्रमुख अतिथी म्हणून प्रल्हाद वानखडे, शशिकला वानखडे, श्री व सौ चऱ्हाटे दांपत्य होते.
शाळेच्या परिसराची आकर्षक व सुरेख सजावट विशेष आकर्षण होते.आजी आजोबांना ग्रीटिंग कार्ड व गुलाबाचे फुल देऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांना आदरपूर्वक स्थानापन्न करण्यात आले. यावेळी कृतज्ञतेने सद्गदित आजी आजोबांचे मन भारावून गेले .कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. सर्वप्रथम वर्ग UKG च्या विद्यार्थ्यांनी स्वागतपर नृत्य सादर केले तर दादा-दादी, नाना-नानी वेलकम टू अवर स्कूल हे स्वागतगीत शुभम नारे व अदिती गावंडे, कनवी पटेल, श्रेयस भटकर,भक्ती सुतार व गौरी सोनटक्के या विद्यार्थ्यांनी सादर केले. प्राथमिक शाळेच्या मुलींनी “Happy Grandparents Day”, हे गीत सादर केले.
सादरकर्ते अनुकृती गवई, कृष्णाली काळे, काव्या राऊत, माही बचे, संबोधी डोंगरे, आराध्या गणवीर होते. गीताचे संयोजन मेघा शर्मांनी केले. तर वर्ग ३ री ४ थीच्या विद्यार्थ्यांनी “तुझमे रब दिखता है यारा मैं क्या करू” या नृत्यातून विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. सादरकर्ते सानिध्या वाहूरवाघ, भाविका गायकवाड, भार्गवी पाटील, गार्गी माहुलकर, तमन्ना वलसे, अदिती जुनारे, पार्थ कानगुडे, रुद्र गोसावी, क्षितिज भागवत, अथर्व पस्तापुरे, योगीराज देशमुख, देवांशु घाटोळ. गीताचे संयोजन प्राजक्ता उपश्याम यांनी केले. वर्ग ४ थी ची विद्यार्थिनी आराध्या बऊराशी हिने आपल्या भाषणातून आजोबांचे आपल्या जीवनातील महत्त्व विषद केले.
वर्ग १ लीची विद्यार्थीनी सृष्टी शित्रे हिने आपल्या कवितेतून आजी आजोबा कसे आहेत ते सांगितले. प्रमुख पाहुण्या शशिकला प्रल्हादराव वानखडे आजींनी स्व:काव्यातून आजी आणि नातवंडाच नाते अतिशय सुंदरपणे मांडले. चऱ्हाटे आजोबांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्या मनिषा राजपूत यांचे आभार मानले.रेड बोर्ड सजावट साक्षी विर्मोट,समीक्षा सोळंके व धनश्री देशमुख यांनी केले.यश मोरे, मृणाली लोखंडे ,ऋतुजा वानखडे गायत्री चारोळे ,अंजली चराटे ,आरुष ठोंबरे, मनस्वी भरणे ,समृद्धी इंगोले ,सोहम , ईशांत राऊत ,अनुष्का पटेल, दर्शन घरडे, दीपा राऊत, रोहिणी पवार ,धनश्री नेमाडे ,आराध्या या विद्यार्थ्यांनी सादर केले.
यावेळी राजपूत आणि प्राचार्या मनिषा राजपूत यांनी आजी आजोबांचे घरातील महत्त्व सांगितले.आज छोट्या कुटुंबामध्ये त्यांचे स्थान हद्दपार होत आहे असे सांगितले.ते आपल्या कुटुंबाचा वारसा,संस्कृती ,संस्कार केंद्र व आधारवड आहेत असे सांगितले. आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन खास आकर्षण ठरले.त्यामुळे आजी आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.आजींसाठी एकावर एक ग्लास रचने खेळाचे आयोजन करण्यात आले. मनोरमा खारोडे या आजींचा विजय झाला. तर एक ग्लास एक प्लेट ठेवून मनोरा रचने या खेळामध्ये श्री परशुराम गायकवाड या आजोबांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर फुलांची माळ तयार करणे या कपल गेम मधे श्री व सौ थोरात यांचा विजय झालेला आहे.
खेळांचे नियोजन प्राजक्ता जांभोरकर, प्राजक्ता उपशाम, देशमुख , कराळे टीचर, बोर्डे, शर्मा, सदाफळे यांनी केले. प्राजक्ता उपश्याम, अदिती गावंडे,अस्था अटकर व इशिका देशमुख या विद्यार्थिनींनी बहारदार संचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे प्रभारी प्राजक्ता उपशाम, उषा कराळे दुर्गा राऊत, सुषमा देशमुख,साधना बोबडे, आगरकर, देशपांडे, जोशी व गाढे यांनी काम पाहिले. सकाळच्या सत्राच्या माधुरी सदाफळे व दुपारच्या सत्रात दुर्गा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदाफळे, बोर्डे, देशमुख, जांभोरकर, उपश्याम, शर्मा, कराळे, मोहोड व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
शेवटी प्राजक्ता जांभोरकर व रिद्धी पवार हीने आजी-आजोबांचे आभार मानले.कार्यक्रम संपल्यानंतर आजी आजोबा आनंदाने नवी उमेद व ऊर्जा घेऊन उत्साहाने परंतु जड अंतकरणाने आपल्या घराकडे निघाले.