Monday, January 13, 2025
HomeUncategorizedउद्या अकोल्यात 'रिंगण'चे संपादक सचिन परब यांची प्रकट मुलाखत

उद्या अकोल्यात ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांची प्रकट मुलाखत

अकोला दिव्य ऑनलाईन : संत विचारांचा खरा वारसा सुजाण वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विदर्भ साहित्य संघ, डॉ. गिरीश गांधी फाउंडेशन आणि अकोल्याची जत्रा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवार दि. 20 डिसेंबररोजी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन परब यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. अकोल्यात उद्या दुपारी ४ वाजता प्रभात किड्स, तोष्णीवाल लेआऊट येथे ही मुलाखत होत आहे.

गेली बारा वर्षे दरवर्षी आषाढी एकादशीला ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन परब यांच्या कुशल संपादनात ‘रिंगण’ हा विशेषांक प्रसिद्ध होत आहे. या प्रकट मुलाखतीमध्ये ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांना ‘रिंगण’ या वार्षिकाकांचा प्रवास, त्यानिमित्ताने आलेले अनुभव व त्यामुळे संत विचारांकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन याविषयी रसिक- वाचक-श्रोत्यांशी दिलखुलास संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाला अकोलेकर रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला; डॉ. गिरीश गांधी फाउंडेशन, नागपूर व अकोला आणि अकोल्याची जत्रा यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!