अकोला दिव्य न्यूज ::उत्तराखंडचे माजी आमदार आणि भाजपा नेते कुंवर प्रणव चॅम्पियन यांनी रविवारी खानापूरचे आमदार उमेश कुमार यांच्या रुरकी येथील निवासस्थानावर गोळीबार केला. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.वरिष्ठ पोलीस अधीक्षक (हरिद्वार) परमेंदर डोभाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी आमदार उमेश कुमार यांच्या निवासस्थानासमोर ही घटना घडली.

आम्हाला सोशल मीडियावरील क्लिपद्वारे तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातून माजी आमदाराने आमदाराच्या घरावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली. माजी आमदार आणि त्यांच्या साथीदारांना आम्ही अटक केली आहे. आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू, असं डोभाल म्हणाले. एसएसपीने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, दोन्ही पक्षांनी तक्रारी दाखल केल्यानंतर क्रॉस एफआयआर नोंदवण्यात आला आहे.आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. दोन्ही पक्षांवर आरोप आहेत आणि आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. माजी आमदाराने वापरलेली बंदूक परवानाधारक आहे की नाही हे आम्ही तपासत आहोत, असंही ते म्हणाले. निघून जातानाही त्यांनी केला गोळीबार
व्हिडिओमध्ये चॅम्पियन आणि त्याचे सहकारी आमदाराच्या घरी अनेक वेळा गोळीबार करताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्यांनी घरावर दगडफेकही केली. निघून जाण्याआधी कारमध्येमध्ये बसण्याआधी त्यांनी पुन्हा त्यांच्या घरावर गोळीबार केला. सत्ताधारी भाजपाने या घटनेवर चिंता व्यक्त केली, तर विरोधी काँग्रेसने आमदाराच्या घरावर झालेल्या गोळीबाराची घटना राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली, अशी टीका केली. भाजपाची भूमिका काय? भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट म्हणाले की, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा प्रकारची कृत्ये थांबली पाहिजेत. जो कोणी असे वातावरण निर्माण करतो त्याला शिक्षा झाली पाहिजे”, असे गोळीबाराच्या घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले.
