अकोला दिव्य न्यूज : ॐ नमस्तस्यै गणपती…त्वमेय प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि……..अशा शब्दात हजारोवर विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठन करीत गणेशाचा जयघोष केला.अथर्वशीर्षाच्या जयघोषात जठारपेठेतील सिद्धीविनायक गणेश मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. श्री.गणेश जयंतीच्या निमित्ताने ज्योति नगरातील सिद्धिविनायक मंदिरात एक लक्ष वेळा सामूहिक अथर्वशीर्ष पठनाचे आयोजन ॲड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, नीलेश देव मित्र मंडळ, भारत शिक्षण प्रसारक मंडळ व सिद्धिविनायक गणेश मंदिराच्यावतीने आज शनिवार १ फेब्रुवारीला करण्यात आले होते.

प्रारंभी मंदिराचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर जोशी, उपाध्यक्ष प्रभाकर दोड, सचिव निनाद आठवले, भारत शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष अनिल पिंपरकर, निशिकांत पुजारी, भारत विद्यालय मुख्याध्यापक संजय घोगरे, विवेकानंद इंग्रजी स्कुल उपमुख्याध्यापिका मिनल कापसे, डॉ. पल्लवी दिवेकर यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर अथर्वशीर्ष पठणाला सुरूवात करण्यात आली.भारत विद्यालय, विवेकानंद इंग्लिश स्कूलच्यासह एकविरा विशेष बालविकास संस्थेचे मूकबधीर विद्यार्थीही सहभागी झाले होते. हजारो विद्यार्थ्यांच्या आवाजातील गणपती अथर्वशीर्ष वदनाने परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते.भाविकही भारावून गेले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पिंपरकर यांनी केले. सूत्र संचालन अमरजा ढोमे तर आभार रश्मी देव यांनी मानले. कार्यक्रमाला नीलेश देव, जयंत सरदेशपांडे, संजय रुहाटिया, अविनाश देव, मोहन गद्रे, प्रा. नरेंद्र देशपांडे, संजय काळे, डॉ. विनायक देशमुख, कुशन सेनाड, डॉ. पनपालिया, दिलीप देशपांडे, दीपक देशपांडे, उदय महा, राजेश शर्मा, दीपक शुक्ला, सुधीर सोमण, नरेश बियाणी, विनोद देव, ॲड. शिशीर देशपांडे यांच्यासह प.पु. प्रल्हाद महाराज उपासना मंडळ, प.पु. गोंदवलेकर महाराज उपासना मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.स्नेहा गोखले, अवंतिका मैराळ, मंजुषा घोटीकर, मेघा देशमुख, सीमा सरदेशपांडे, प्रणाली शास्ती, शिल्पा दलाल, सीमा फडणीस, स्वाती देवधर, रुपाली चोपडे, सोनाली वरसारे, संजय भालेराव, अग्निहोत्री, राजेंद्र गुणल्लवार, सुनिल देशपांडे, प्रकाश जोशी, राजु कनोजिया, अजय शास्त्री, रामहरी डांगे, रविंद्र मेश्राम, विजय वाघ, नरेंद्र परदेशी, सोनु मोठे, मनिष अभ्यंकर, सुनिल देशपांडे, डॉ. मोहन, काजळे, शैलेश देव, गणेश मैराळ आशु यादव, निलेश दुधलम उपस्थित होते.
