अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील जवळपास १०९ वर्षांपासून निष्कलंक कारभारासाठी ख्यातनाम अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी डॉ. जयराम संतोष दादा कोरपे यांची अविरोध निवड झाली आहे. डॉ. जयराज कोरपे हे सुप्रसिध्द किडनी विकार तज्ञ असून उच्च विद्याविभुषीत आहेत.

बँकेचे संचालक हिदायतउल्लाखाँ बरकतउल्लाखाँ पटेल यांनी व्यक्तीगत कारणाने संचालकपदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. सदर रिक्त पद भरणे आवश्यक असल्यानेच अकोला जिल्हा उपनिबंधक यांनी यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज सोमवार दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी संचालक मंडळाच्या सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
या प्रक्रियेत डॉ. जयराज कोरपे यांचाच एकमेव अर्ज असल्याने अध्यासी अधिकारी तथा अकोला सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ प्रविण लोखंडे यांनी डॉ जयराज कोरपे यांची बँकेचे संचालक म्हणून अविरोध घोषीत केले.