अकोला दिव्य न्यूज : मुख्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अकोला तर्फे स्थानिक शिवाजी पार्क येथे आज पासून भव्य असे शिवकालीन नाणे व जागतिक मुद्रा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अक्ष करन्सीज’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी महापौर विजय अग्रवाल यांचे हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अकोला शहर भाजपाचे अध्यक्ष जयंतराव मसने, मुख्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पवन महल्ले, अ.भा.लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे, प्रदर्शनाचे संयोजक अक्षय खाडे, अँड.अनिल निंबाळकर, राजेंद्र गिरी प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर प्रदर्शनात शिवकालीन नाणे, संपूर्ण जुन्या भारतीय चलनातील नोटा, जुनी नाणी, सुमारे 1200 सालापासूनचे मुगल व इतरही राजांच्या काळातील नाणी, संपूर्ण जगातील चलनी नोटा व नाणे यांच्यासह प्रत्येकाच्या जन्म तारखेच्या नोटांचा समावेश आहे. याच प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रांचे सुद्धा प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सदर प्रदर्शनी 19 फेब्रुवारी 2025 पर्यंत सर्वांसाठी दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंत सर्वांना बघण्यासाठी विनामूल्य खुली राहील. संपूर्ण विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठीही अतिशय प्रेक्षणीय असणाऱ्या या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रकाश भोगलिया, रमेश परिहार, प्रदीप लुगडे, गगन ओबेराय, राम बोंद्रे, निरंजन पावसाळे, संदीप बाथो, रोशन जगताप, अमन मंडुळे, साहिल सप्रे, राजेश कामठीकर, रोशन कसाब, वैभव मोरे, ललित भंगाळे, उज्वल पोफळे आदी उपस्थित होते. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाकरिता अक्षय खाडे, आशय खाडे, पल्लवी खाडे, साक्षी खाडे,ऍड निखिल देशमुख, आशिष गोसावी, अक्षय अरबट, मयूर राऊत आदी परिश्रम घेत आहेत.
