Saturday, March 22, 2025
HomeUncategorizedवाशिम-मालेगांव समृध्दी मार्गावर अपघातात 1 ठार 8 प्रवाशी गंभीर

वाशिम-मालेगांव समृध्दी मार्गावर अपघातात 1 ठार 8 प्रवाशी गंभीर

अकोला दिव्य न्यूज : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. या अपघातात एक प्रवाशी ठार झाला असून 7 ते 8 प्रवाशी गंभीर जखमी तर 15 ते 20 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. पुण्यावरून नागपूरला जात असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटून किंवा झोपेची डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स पलटी होऊन हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

Oplus_131072

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव जवळ समृद्धी महामार्गावर सकाळी 5 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.पुणे वरून नागपुर कडे जात असलेल्या MH 12 HG 6667 क्रमांकाच्या RLT राजलक्ष्मी ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्ग चॅनेलनं 215 वर नागपूर लेनवर वनोजा टोल प्लाझा पासून मालेगावकडे अंदाजे 5 किमीवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा झोपेची डुलकी आल्याने अपघात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, सात ते आठ प्रवाशी गंभीर जखमी आणि 15 ते 20 जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच सात ते आठ रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी रवाना करण्यात आले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच वाशिम मंगरूळपीर मतदार संघाचे आमदार श्याम खोडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मंगरूळपीरच्या तहसीलदार शितल बंडगर, ठाणेदार सुधाकर आडे, समाजसेवक पवन राठी, सचिन राणे यांनी घटनास्थळी पोहोचून सर्वधर्म संस्थापकलीन संस्थेचे श्याम सवई व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे अनिकेत भेलांडे , बाळू राठोड संत गाडगेबाबा रुग्णवाहिकेचे शुभम खोड नवनिर्माण रुग्णवाहिकेचे विनोद खोड व लोकेशन कारंजा 108 लोकेशन मालेगाव 108 लोकेशन वनोजा 108 शिवनी नांदगाव खंडेश्वर तसेच मंगरूळपीर मानोरा शेलुबाजार येथील उपकेंद्राच्या देखील रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाल्या होत्या.

यावेळी कारंजा अग्निशामक दल, अग्निशामक दल मालेगाव ह्या देखील घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना तात्काळ अकोला, मालेगाव कारंजा आणि शेलुबाजार येथे उपचारार्थ हलविण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत मृतकाची ओळख पटली नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!