अकोला दिव्य न्यूज : डॉ. हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्रच्या वतीने आयोजित रोग निदान शिबिराचा जवळपास १९७ नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये हृदय व फुफ्फुसाच्या व्याधीचे निदान, विविध त्वचा रोगाचे निदान, स्त्री रोग, लहान मुलांच्या विविध आजारांचे निदान, संधिवात, गुडघे दुखी, पाठदुखी, टाचदुखी, फ्रॅक्चर, मानदुखी, हाताला किंवा पायाला मुंग्या येणे, बधिर होणे, ठिसुळ हाड किंवा अन्य हाडांच्या रोगांचे निदान करण्यात आले.

तर २५ रुग्णांची ईसीजी, शुगर, बीएमडी हाडांची ठिसुळता तपासणी मोफत करण्यात आली.या शिबिरात डॉ.तुषार चरखा, त्वचारोग तज्ञ डॉ.भरत पटोकार, डॉ.चिन्मय पराडकर, डॉ.अनुप्रिता चौहान, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अमृता टापरे, बालरोग तज्ञ डॉ.अनुप चौधरी, डॉ.अभिजित नालट, आर्थो रोग तज्ञ डॉ. प्रकाश मेटांगे, डॉ.दर्शन तातिया यांनी वैद्यकीय सेवा दिली.

या शिबिराला डॉ.बोराखडे, डॉ.कोरडे, डॉ.डोईफोडे, डॉ.करे, डॉ पुसेगावकर, डॉ.श्रावगी, डॉ.घिरणीकर, विरेश खंडेलवाल यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रकल्प प्रमुख डॉ. विनायक देशमुख, अध्यक्ष बाबासाहेब पाठक, उपाध्यक्ष संजय सोमाणी, सचिव संदीप हातवळणे

तसेच सदस्य डॉ.अलका तामणे, डॉ.पार्थसारथी शुक्ला, डॉ. निखिल महाजन, डॉ.कल्याणी पराडकर, डॉ प्रशांत मालवीय, डॉ अजयसिंह चौहान, डॉ.अनुजा नासरे, डॉ.आशिष तापडिया, डॉ.अपेक्षा मालविया, डॉ. मयुरी महाजन, डॉ.आशा निकिते, डॉ साधना लोटे, डॉ नितिन ओक, आर्की.अतुल बंग, अँड.धनंजय पाटील, महेश जोशी, प्रविण वाणी, मधूर खंडेलवाल, प्रा. किशोर बुटोले, नरेंद्र दहिकर, प्रविण हातवळणे, पंकज पाठक, समीर थोडगे, अकोला अर्बन बँक कर्मचारी सेवा समितीचे सदस्य, व्यवस्थापक संजय ठोकळ व रूग्णालयाच्या समस्त कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
