अकोला दिव्य न्यूज : विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेसंदर्भात जागृती निर्माण व्हावी तसेच रस्त्याने जाताना पाळावयाचे नियम, स्कूल बस संदर्भातील शिस्त ह्या विषयी माहिती व्हावी या उद्देशाने प्रभात किड्स स्कूल येथे प्रभात किड्स स्कूल रोटरी क्लब ऑफ अकोला (इस्ट) तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने खास विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रभातमधील ट्रॅफीक पार्क हा विद्यार्थी तसेच पालक यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी ट्रॅफीक पार्कबद्दलची माहिती दिली, ती कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कार्यशाळेसाठी लाभलेले प्रमुख मार्गदर्शक प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी आपल्या मनोगतातून केले.
प्रभातच्या संचालिका वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सहृदय सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर रोटरी क्लब ऑफ अकोला (इस्ट)च्या अध्यक्षा पुनम मुंदडा, सचिव रमण राठी, मनोज मालोदे, जयंतीलाल वाघेला, अशोक मुंदडा, सुनिल साधवानी, ओंकार गांगर्डे यांच्यासह प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे, व्यवस्थापक अभिजीत जोशी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार झिनल सेठ यांनी केले. रस्ता सुरक्षा कार्यशाळेसाठी प्रभातचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांच्या मार्गदर्शनात वर्षा जानोरकर, समीर कुलकर्णी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी यांना परिश्रम घेतले.