Sunday, March 23, 2025
HomeUncategorizedवनडेचा शहेनशहा ! विराट कोहलीने जगभरातील सर्व फलंदाजांना टाकलं मागे

वनडेचा शहेनशहा ! विराट कोहलीने जगभरातील सर्व फलंदाजांना टाकलं मागे

अकोला दिव्य न्यूज : Virat Kohli becomes fastest to hit 14000 ODI runs: टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील हायव्होल्टेज सामना भारताविरूद्ध खेळत आहे. उभय संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास लिहिला आहे. विराटने एका खास यादीत जगातील सर्व फलंदाजांना मागे टाकले आहे. त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे जो आतापर्यंत क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

नावात काय आहे, हे चुकीचे ठरवले ते ‘विराट’ खेळाने

पाकिस्तानविरूद्ध सामन्यात १५ धावा करत विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४ हजार धावा पूर्ण करून इतिहास लिहिला आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १४ हजार धावा करणारा फलंदाज आहे. त्याने केवळ २८७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा १९ वर्ष जुना विश्वविक्रम मोडला आहे. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये ३५० डावात १४ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सचिनने २००६ साली पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून या धावा पूर्ण केल्या होत्या.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात १४ हजार हून अधिक धावा करणारा विराट कोहली हा केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताचा सचिन तेंडुलकर (१८,४२६ धावा) आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा (१४२३४ धावा) यांनी ही कामगिरी केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!