Sunday, March 23, 2025
HomeUncategorizedमहाशिवरात्री कधी ? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि पूजा विधी

महाशिवरात्री कधी ? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि पूजा विधी

अकोला दिव्य न्यूज : When Is Mahashivratri 2025 Date : माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हा सण अंत्यत पवित्र असून या दिवशी शिव-शक्तीचे मिलन होते. शास्त्रानुसार असे म्हटले जाते की, महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता.

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्विकारले होते. असे म्हटले जाते की, महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधीवत पूजा करतो.भगवान शंकराचा अभिषेक करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या सोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो.

यंदा महाशिवरात्री कधी साजरी केली जाणार आहे. : यंदा महाशिवरात्रीचे व्रत माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला असणार आहे. बुधवारी २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे व्रत करण्यात येईल. ही तिथी २५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरु होईल.

महाशिवरात्री पूजा विधी : महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. तसेच उपवासाचा संकल्प करावा. •या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करावी. त्यांना नवीन वस्त्र अर्पण करावे. •महाशिवरात्रीला विवाहित महिलांनी देवी पार्वतीला श्रृंगाराचे सर्व सामान अर्पण करावे. •महाशिवरात्री निमित्त शंकराला बेलपत्र, भांग, धतुरा अर्पण करावा. तसेच, या दिवशी शिव परिवाराला म्हणजे भगवान गणेश, भगवान कार्तिकेय, भगवान शिव, देवी पार्वती आणि नंदी महाराज यांना वस्त्र अर्पण करा.

  • महाशिवरात्रीचं महत्व :
  • महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा झाला. प्रत्येक महिन्यात येणारी त्रयोदशी तिथी ही शिवरात्री म्हणून ओळखली जाते. या तिथीला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा चंद्र कमकुवत अवस्थेत होता म्हणून शंकराने त्याला आपल्या डोक्यावर धारण केले. त्यामुळे भगवान शंकराची नियमितपणे पूजा उपासना केल्याने कुंडलीतील चंद्र दोष दूर होतो.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!