Saturday, May 18, 2024
Home न्याय-निवाडा बिल्डर्सकडून नियमाचे उल्लंघन ! ३७० प्रकल्पांविरोधात दंडात्मक कारवाई : नागपूर क्षेत्रातील ३५...

बिल्डर्सकडून नियमाचे उल्लंघन ! ३७० प्रकल्पांविरोधात दंडात्मक कारवाई : नागपूर क्षेत्रातील ३५ प्रकल्प

अकोला दिव्य न्युज ब्युरो : रेरा कायद्यानुसार कोणत्याही गृहप्रकल्पाची जाहिरात वा सदनिकांची विक्री करण्यासाठी महारेरा नोंदणी क्रमांक आणि क्यूआर कोड बंधनकारक आहे. असे असताना या नियमाचे उल्लंघन करून जाहिरात करणाऱ्या ३७० गृहप्रकल्पांविरोधात महारेराने दंडात्मक कारवाई केली आहे. या प्रकल्पांना ३३ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असून यापैकी २२ लाख २० हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या प्रकल्पात मुंबईतील १७३, पुणे क्षेत्रातील १६२ आणि नागपूर क्षेत्रातील ३५ प्रकल्पांचा समावेश आहे.

बांधकाम व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी, तसेच विकासकांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने महारेराच्या माध्यमातून रेरा कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. ग्राहकांचे हित जपण्याच्या दृष्टीने आणि विकासकांवर वचक ठेवण्यासाठी रेरा कायद्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे महारेरा नोंदणीशिवाय कोणत्याही प्रकल्पातील घरांची विक्री वा त्या प्रकल्पाची जाहिरात करता येत नाही. आता क्यूआर कोडही बंधनकारक करण्यात आला आहे. असे असताना अनेक विकासक आजही या नियमाचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे आता महारेराने अशा प्रकल्पाविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ३७० प्रकल्पांचा शोध घेऊन महारेराने त्यांना ३३ लाख रुपये दंड ठोठावला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रकल्प मुंबई क्षेत्रातील (मुंबई, ठाणे आणि कोकण) आहेत. मुंबई क्षेत्रातील प्रकल्पांची एकूण संख्या १७३ इतकी असून यातील ८९ प्रकल्पांनी जाहिरातींमध्ये महारेरा क्रमांक प्रसिद्ध केलेला नाही, तर ८४ प्रकल्पांनी क्यूआर कोडविना जाहिरात प्रसिद्ध केल्या आहेत. या ८९ प्रकल्पांना १४ लाख ७५ हजार रुपये तर ८४ प्रकल्पांना ५ लाख ६० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी अनुक्रमे ११ लाख ७५ हजार रुपये आणि २ लाख १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे क्षेत्रातील १६२ प्रकल्पांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. १६२ पैकी १०१ प्रकल्पांनी महारेरा नोंदणीशिवाय, तर ६१ प्रकल्पांनी क्यूआर कोडशिवाय जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या प्रकल्पांना अनुक्रमे ६ लाख ३० हजार रुपये आणि ३ लाख २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

१०१ प्रकल्पांकडून ४ लाख १० हजार रुपये आणि ६१ प्रकल्पांकडून १ लाख २५ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. नागपूर क्षेत्रातील ३५ प्रकल्पांविरोधात कारवाई करून ३ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, ग्राहकांनी महारेरा नोंदणी क्रमांकासह क्यूआर कोड आणि इतर सर्व बाबी तपासून घर खरेदी करावे, असे आवाहन महारेराकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

‘CA’च्या परीक्षा वेळापत्रकानुसारच ! निवडणुकीमुळे काही पेपर पुढे ढकलण्यास ‘सुको’ चा नकार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात होणाऱ्या चार्टर्ड अकाउंटन्सीच्या (सीए) परीक्षेचे काही पेपर पुढे ढकलण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सुनावणी...

निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य राखा ! सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारलं

अकोला दिव्य न्युज ब्युरो : 'निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य राखा”, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला चांगलं फटकारलं आहे. तसंच,...

सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल ! आक्षेपार्ह पोस्टसाठी 13 जणांचा शोध सुरू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची बदनामी, विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट हुडकून काढणे माध्यम...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!