Sunday, May 5, 2024
Home संपादकिय 14 कोटींची देणगी ! 9 कामगारांचा मृत्यू ! स्फोटक प्रश्न अनुत्तरित...

14 कोटींची देणगी ! 9 कामगारांचा मृत्यू ! स्फोटक प्रश्न अनुत्तरित तर कारवाईचे काय ?

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : महाराष्ट्र शासनाकडून अलिकडेच सुरक्षाविषयक उपाययोजना योग्य पद्धतीने राबवल्या म्हणून अनेक पुरस्कार देण्यात आलेल्या नागपूरजवळील सोलार एक्सप्लोझिव्ह कारखान्यात रविवारी सकाळी झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा मृत्यूमुळे कंपनीच्या कार्यक्षमतेवर आणि दिले गेलेले पुरस्कार का आणि कोणास बघून की, खरोखरच कंपनीत उपाययोजना राबवल्या गेल्याने पुरस्कार प्रदान करण्यात आले ! असा कळीचा मुद्दा आहे. देशविदेशातील खासगी उद्योग तसेच सैन्यदलांना स्फोटके तसेच दारूगोळा पुरवणारी ही सोलार कंपनी औद्योगिक व सुरक्षाविषयक नियम पाळत नव्हती, हे या स्फोटाने दाखवून दिले. बहुतेक मृत कामगार आजूबाजूच्या गावांतून इथे नऊ ते बारा हजार रुपयांवर काम करणारे. त्यांना स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण दिले होते का ? दिले असेल तर त्यांच्या गणवेशावर सुरक्षाविषयक साधने का नव्हती ? RDX सारखे स्फोटक हाताळतो आहोत याची त्यांना कल्पना तरी होती का ? अशी कामे तात्पुरत्या/ कंत्राटी कामगारांकडून करून घेता येतात का ? असे अनेक गंभीर प्रश्न या दुर्घटनेने उपस्थित केले आहेत. मात्र या अतिशय गंभीर प्रश्नाचे उत्तर आजचं काळाच्या पडद्याआड गेले, हे सर्वश्रुत आहेच.

सकाळी ही दुर्घटना घडल्यानंतर काही तासांच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर या तीनही प्रमुख नेत्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये याची राज्य शासनामार्फत चौकशी करू असा उल्लेख नाही. एरवी किरकोळ दुर्घटना घडली तरी चौकशी करू असे दिलासादायक शब्द वापरणाऱ्या या नेत्यांनी या वेळी हा उल्लेख का टाळला ? या उद्योगाची सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळात असलेली ऊठबस याला कारणीभूत आहे का ? जागतिकस्तरावर औद्योगिक स्फोटकांचे उत्पादन करणारी ही कंपनी सत्यनारायण नुवाल यांच्या मालकीची असून करोना संकट काळात प्रस्तावित अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला सत्यनारायण नुवाल यांनी तब्बल १४ कोटी रुपयांची देणगी दिली होती.

विदर्भातून प्रस्तावित राम मंदिराला १४ कोटींची देणगी देऊन प्रसिद्ध उद्योगपती सत्यनारायण नुवाल प्रसिद्धीच्या झोतात आले होते. हा योगायोग म्हणा की आणखी काही, पण यानंतर त्यांना संरक्षण दलाची अनेक कंत्राटे मिळू लागली व दोन वर्षांतच ते देशातील नामांकित स्फोटके पुरवठादार म्हणून ओळखले जाऊ लागले. एवढेच नव्हे तर अगदी अलीकडे एका नियतकालिकाने जाहीर केलेल्या देशातील शंभर प्रभावशाली उद्योगपतींच्या यादीत नुवाल यांचा समावेश झाला होता.

स्फोटकांच्या निर्मितीसाठी केंद्राच्या अधीनस्थ काम करणाऱ्या पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (पेसो) कडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. याचे मुख्यालय नागपुरातच व जिथे स्फोट झाला त्या कारखान्यापासून अवघ्या काही अंतरावर. सोलारने चार प्रकारची स्फोटके तयार करण्याची परवानगी घेतली होती हे खरे असले तरी पेसोकडून या कारखान्याचे नियमित निरीक्षण होत होते का? झाले तर ते कधी झाले? स्फोटके हाताळणारे कामगार प्रशिक्षित आहेत की नाही हे तेव्हा लक्षात कसे आले नाही? याची उत्तरे आज कुणीही द्यायला तयार नाही. आता पेसोने चौकशी आरंभली असली तरी ती नेमक्या निष्कर्षांप्रत जाईल का याविषयी शंकाच आहे. दुसरीकडे घातपाताच्या घटनांमध्ये सापडलेल्या स्फोटकांवर या कंपनीचा शिक्का आढळून आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विशेष मर्जीतील उद्योगपतींसाठी कोणताही कालावधी अमृतकाळासारखाच ! याच सोलार कंपनीत २०१८ मध्येसुद्धा दुर्घटना घडली होती. त्यापासून या कंपनीने कोणताही बोध घेतला नसल्याचे या भयावह स्फोटाने दाखवून दिले आहे.पण बोध का घेतला नाही, हे लक्षात येते.

अलीकडे विरोधी सूरही ऐकून घेणार नाही अशी वृत्ती सर्वच पातळ्यांवर फोफावत चालली आहे. हा दृष्टिकोन सर्वाना समान न्याय या लोकशाहीतील तत्त्वालाच हरताळ फासणारा आहे. बहुमताने मिळालेली सत्ता आहे म्हणून व्यवस्थेला पाहिजे तसे वाकवण्याचे हे प्रकार घातक आहेत, शिवाय देशाला बजबजपुरीकडे नेणारे आहेत. व्यक्ती व त्याने निर्माण केलेला उद्योग कितीही मोठा असला तरी कायदा सर्वासाठी समान याचेच दर्शन अशा प्रकरणात व्हायला हवे. नेमके तेच होताना दिसत नाही. त्यामुळे प्राण गमावलेले जीव खरोखरच दुर्दैवी होते असे म्हणण्याची वेळ या उद्योगपतीप्रेमी वर्तनाने सर्वावर आणली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना !

RELATED ARTICLES

डिजिटल भारतात टक्केवारीसाठी 11 दिवस विलंब का ? निवडणूक आयोग मात्र मतदारांच्या संभ्रमास्थेवर गप्प !

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोकसभेच्या महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिळून १३ मतदारसंघामध्ये मतदान झाल्यानंतर त्यावेळी दिवशी सायंकाळी...

खरेतर काँग्रेसने मोदींचं आभार मानायला हवेत ! आता ‘मोदी की गॅरंटी’ चिरनिद्रा घेत आहे

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : मागील 10 वर्षांपासून सतत 'इलेक्शन मोड' वर राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचारासाठी विशेष मुद्द्यांची...

फक्त 51.83 टक्केच महिलांनी बजावला अकोला पश्चिममध्ये मतदानाचा हक्क ! बाळापूरात सर्वात जास्त

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काल 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानात 58.50 टक्के महिलांनी मतदानाचा...

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

अँड उज्ज्वल निकमांनी करकरेंना लागलेल्या गोळीचे सत्य न्यायालयापासून लपवलं ! वडेट्टीवार यांच विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती आणि आताचे भाजपाचे उत्तर मध्य मुंबईतील...

राष्ट्रीय पातळीवर श्री समर्थ कोचिंग क्लासेसचा नावलौकिक !जेईई मेन परिक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पश्चिम विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या मुलभूतरित्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर व ख्यातनाम अकोल्यातील श्री समर्थ कोचिंग क्लासेसच्या...

अकोल्यातील अल्पवयीन मुलीची धर्मांतरानंतर एक लाखांत राजस्थानात विक्री; आईसह टोळी जेरबंद

Akola crime:अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला येथील एका अल्पवयीन मुलीची धर्मांतर करून तिचा राजस्थानातील तरुणाशी यवतमाळात विवाह लावून देत एक लाख...

मोठी बातमी : लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अडकलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएसचे नेते एचडी रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास...

Recent Comments