Thursday, September 19, 2024
Homeसामाजिकआदिवासी सोबत दिवाळी ! निलेश देव मित्र मंडळाच्या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

आदिवासी सोबत दिवाळी ! निलेश देव मित्र मंडळाच्या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर निलेश देव मित्र मंडळाने यंदा अ‍ॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून उद्या शुक्रवार १० नोव्हेंबर २०२३ रोजी अ‍ॅड.धनश्री देव यांच्या तृतीय स्मृति दिनी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मेळघाटातील परीवारासोबत दिवाळी साजरी करणार आहे. आदिवासींच्या सुमारे साडेसहाशे परिवारासाठी रेडिमेड कपडे वाटप कार्यक्रमाचा उपक्रम पुर्णत्वास जाणार आहे.

विदर्भातून मोठ्या प्रमाणात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला आहे. अकोलेकरांनी तर या उपक्रमास प्रतिसाद दिलाच पण सोशल मिडियाच्या माध्यमातून थेट महाबळेश्वर येथून देखील कपडे वाटपासाठी आले आहे अशी माहिती निलेश देव यांनी दिली.
अ‍ॅड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या जठारपेठ स्थित कार्यालय पुष्पक अपार्टमेंट सातव चौक येथून १० नोव्हेंबर रोजी प्रा. अजंलीताई आंबेडकर यांच्या हस्ते पथक रवाना होईल, त्यावेळेस सुधाकरराव जकाते यांचे आशीर्वाद लाभणार आहे, यावेळी लायन्स क्लब ऑफ मीडटाऊन गोल्डच्या अध्यक्षा अनीता उपाध्याय, कैलास बिचकुडे, मानव अधिकार अ‍ॅक्शन फोरम, नम्रता अग्रवाल अध्यक्ष लिनेस क्लब ऑफ अकोला यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!