Saturday, May 18, 2024
Home सांस्कृतिक धनतेरसचा खरेदी मुहूर्त ! सोने, चांदीसह वस्तू खरेदीचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया

धनतेरसचा खरेदी मुहूर्त ! सोने, चांदीसह वस्तू खरेदीचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया

अकोला दिव्य न्युज ब्युरो : यंदा धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी अत्यंत शुभ हस्त नक्षत्रात साजरी केली जाणार आहे. हस्त नक्षत्राचा अधिपती ग्रह चंद्र आहे. त्यामुळे यंदाची धनत्रयोदशी आर्थिक आणि राजकीय अशांतता, अस्वस्थता, संवेदनशीलता, करुणा, उग्रता, प्रेम, दया आणि कला यांचा समावेशात साजरी होणार आहे.

उद्या शुक्रवार १० नोव्हेंबरला द्वादशी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील आणि त्यानंतर तेरस तिथी सुरू होईल. हस्तनक्षत्र १० नोव्हेंबर रोजी दिवसभर राहील. सायंकाळी ५ वाजून २ मिनिटापर्यंत विश्वकुंभ योग तयार होणार असून त्यानंतर पृथ्वी योग होणार आहे. उद्या तिथी ११ नोव्हेंबरला आहे. पण धन त्रयोदशी १० नोव्हेंबरलाच साजरी होईल. हस्त नक्षत्रातील लक्ष्मी-कुबेर पूजेचा आर्थिक स्थैर्यावर विचित्र प्रभाव पडेल, तर नजीकच्या भविष्यात विचित्र आर्थिक आणि राजकीय परिस्थितीही पाहायला मिळेल.

राहुकाल सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी १२ वाजेपर्यंत राहील. धनत्रयोदशीच्या दिवशी वृषभ लग्न राशीत कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करणे चांगले राहील. भगवान धन्वंतरी यांना हिंदू धर्मात देव वैद्य ही पदवी आहे. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी धन्वंतरी पूजा अमृत चौघडिया, लाभ चौघडिया, धनु राशी किंवा कुंभ लग्न राशीत करावी.

लक्ष्मी नेहमी हिशोबाच्या खात्यात वास करते. धनत्रयोदशीला ग्रंथ खरेदी करून त्याची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. हिशोबाचे पुस्तक, चोपडा म्हणजेच हिशेब लिहिण्यासाठीचे पुस्तक खरेदी शुभ चौघडियातच करावी. धन त्रयोदशीच्या दिवशी चांदीची खरेदी हे शुभकारक आहे.या दिवशी खरेदी केलेल्या चांदीचे मूल्य नऊ पटीने वाढते. वृषभ राशीत सोने, चांदी आणि इतर धातूंची खरेदी करावी. शुभ-चौघडिया, उद्वेग-चौघडिया आणि कुंभ लग्नादरम्यान मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घरी आणणे शुभ आहे.

धनत्रयोदशीला शुभ चौघडिया: या वेळेत खरेदी करने शुभ ठरेल.
चर चौघडिया- सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजेपर्यंत.
लाभ चौघडिया– सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत.
अमृत चौघडिया- सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत.

शुभ चौघडिया- दुपारी 12 ते 1.30 पर्यंत
चर चौघडिया– सायं ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत.
लाभ चौघडिया- रात्री ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत.

RELATED ARTICLES

जय परशुराम ! आज सायंकाळी ‘आपली संस्कृती-आमचे संस्कार’ मालिकेचे महिलांकडून सादरीकरण

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महिलांमधील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी राजस्थानी लोकगीत, अंबाबाईची गाथा व रास गरबा, महाराष्ट्रातील संस्कृती आणि 'आमची...

UPSC चे निकाल जाहीर ! आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेश प्रधान दुसऱ्या क्रमांकावर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले असून आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला...

उद्यापासुन बिर्ला राम मंदिरात संगीतमय श्रीराम कथा : निलेश देव मित्र मंडळाचा उपक्रम

अकोला दिव्य न्युज ब्युरो : गुढीपाडव्यापासून डॉ. भूषण फडके यांच्या ओजस्वी वाणीतून बिर्ला मंदिर येथे संगीत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!