Saturday, May 18, 2024
Home अकोला जिल्हा अकोला : प्रभातची शुटर अनुश्री उईके राज्यस्तरावर

अकोला : प्रभातची शुटर अनुश्री उईके राज्यस्तरावर

अकोला दिव्य न्यूज : प्रभात किड्स स्कूलची रायफल शुटर अनुश्री उईकेने अमरावती येथे झालेल्या विभाग स्तरावर रायफल शुटींग स्पर्धेत उत्कृष्ट यश प्राप्त केल्याने तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विभागस्तरीय रायफल शुटींग स्पर्धेचे आयोजन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमराती येथे ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले होते.या स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींमध्ये अनुश्री उईके हिने ओपन साईट प्रकारात तिसरा क्रमांक मिळविला. अनुश्रीला ज्येष्ठ रायफल शुटींग मार्गदर्शक विन्सेंट अमेर व प्रभातच्या क्रीडा प्रशिक्षक कोमल यादव यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर यांनी अनुश्रीचे कौतुक केले असून प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

रडीचा डाव! डॉ.अभय पाटलांच्या संदर्भात न्युज चॅनलच्या स्क्रीन शॉटवर खोटी बातमी केली व्हायरल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अभय काशिनाथ पाटील यांचा विजय दृष्टीक्षेपात दिसत असल्याने की...

अकोल्यात धक्कादायक प्रकार ! अफजल खानाचा वध दाखवल्यानं कॉलेज तरुणांना माफी मागायला लावली

अकोला दिव्य न्युज ब्युरो : छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करताना अफजल खानाचा वध दाखवल्याप्रकरणी तरुणांना माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

प्रभातच्या 3 खेळाडूंची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेमध्ये निवड.

अकोला दिव्य : प्रभात किड्स स्कूलच्या 3 खेळाडूंनी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सहभाग घेतला होता. या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत विविध शाळेच्या खेळाडूंनी देखील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!