Saturday, May 18, 2024
Home आरोग्य मदन भरगड देणार 1 लाखाचे बक्षीस ! मोर्णा काठावर अधिकाऱ्यांनी 1 तास...

मदन भरगड देणार 1 लाखाचे बक्षीस ! मोर्णा काठावर अधिकाऱ्यांनी 1 तास उभे राहुन दाखवावे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील मालमत्ताधारकांकडून मालमत्ताकराची वसूली ही खाजगी कंपनी स्वाती इंडस्ट्रीकडून दादागिरीने करून घेत आहे. मात्र अकोलेकरांच्या आरोग्याकडे मनपाचे साफ दुर्लक्ष आहे, असा आरोप करत माजी महापौर व प्रदेश कांग्रेस कमिटी सचिव मदन भरगड यांनी मनपाच्या कोणत्याही अधिकारीने मोर्णा काठावर १ तास उभं राहून दाखविल्यास त्यांना १ लाख रुपयाचे बक्षीस देणार असे आव्हान केले. अकोल्यात धूळीचे प्रमाण खुप जास्त वाढल्यामुळे शहराच्या हवेतील गुणवत्ता खुप खराब झाली आहे.याबाबतीत मुंबई नंतर अकोला शहरचा दुसरा क्रंमाक असून याचा नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे, पण अकोला मनपाचे याकड़े पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अकोला शहराची वाढलेली खराब गुणवत्ता कमी करण्यास मनपा कोणतेही प्रयत्न करतांना दिसत नाही. असे भरगड यांनी सांगितले.
शहराच्या मध्यभागी असलेल्या मोर्णा नदीमधील जलकुंभीने डासांचा प्रादुर्भाव खुप जास्त वाढलेला आहे. नदिच्याकाठावरील खोलेश्वर, राजपूतपूरा, कमला नेहरूनगर, अनिकट, गीतानगर, शालिनी व रीगल टॉकीजच्या मागे, निमवाड़ी, गुलजारपूरा या वस्त्यातील व वस्त्याला लागून असलेल्या अनेक वस्त्यामधे राहणारे लाखो नागरिक मच्छरामुळे त्रस्त झाले आहेत.संध्याकाळच्या वेळेस या वस्त्यामधे मनपाचा कोणत्याही अधिकाऱ्यांनी १ तास उभं राहून दाखविल्यास त्यांना १ लाख रुपयाचे बक्षीस देणार असे आव्हान भरगड यांनी केले.
मच्छर व धुळीमुळे शहरात मलेरिया, डेंग्यू, चीकनगुनिया सारख्या आजारांचे प्रमाण अतोनात वाढले आहे. नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपाला अकोलेकरांकडून कराची वसूली करण्याचा नैतिक अधिकारच नाही.मनपा जेव्हा कर वसूल करीत आहे. तेंव्हा प्राथमिक सुविधा पुरविण्याची जवाबदारीही मनपाची आहे.पण मनपा आपले कर्तव्य विसरली आहे.यासाठी युध्दस्तरावर
मनपाने योग्य ती कार्यवाही लवकर सुरु करावी, अन्यथा मनपा विरुद्ध जनआंदोलन सुरु करण्यात येणार आहे, असा इशारा माजी महापौर मदन भरगड यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे ८० टक्के महिलांना समजतच नाही ! सुरुवातीच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार करणे महत्त्वाचे आहे. ओव्हेरियन कॅन्सर म्हणजेच अंडाशयाचा कर्करोग हा जगभरातील महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्वात घातक...

मोठी बातमी ! मोदींचा फोटो का गायब केला ? करोना Covishield लस वादात अन् प्रमाणपत्रावरून ……

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोविड-19 लसीकरणानंतर दिल्या गेलेल्या CoWIN प्रमाणपत्रावरून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकला आहे....

अकोला पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वसनाचा त्यांनाच विसर ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि अकोला जिल्हा पालकमंत्री यांनी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरात शहरातील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!