Saturday, March 2, 2024
Home राष्ट्रीय अकोल्यात श्री गुरू तेगबहादरजी यांचे शहिदी गुरपुरब शनिवार 2 डिसेंबररोजी

अकोल्यात श्री गुरू तेगबहादरजी यांचे शहिदी गुरपुरब शनिवार 2 डिसेंबररोजी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : हिंदु धर्माचे रक्षणासाठी आपले बलिदान देणारे सिक्ख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादरजी यांचा शहिदी गुरपुरब (बलीदान दिवस) सालाबाद प्रमाणे या वर्षी शनिवार 2 डिसेंबर 2023 रोजी न्यु राधाकिसन प्लॉट येथील हिन्दु सिक्ख एकताचे प्रतिक गुरूद्वारा श्री गुरु तेगबहादरजी येथे श्रध्दापुर्वक साजरा करण्यात येत आहे. या प्रसंगी सर्व प्रथम श्री गुरूग्रंथ साहिब पाठाची समाप्ती सकाळी 10.30 वाजता गुरूद्वारा मध्ये होईल.

कार्यक्रम हवामान खात्याने दर्शविलेल्या प्रमाणे पाऊस येण्याची शक्यता असल्याने गुरुद्वारा येथील कार्यक्रमानंतर पुढील कार्यक्रम अग्रसेन भवन येथे सकाळी 11.30 वाजता पासुन दुपारी 1.30 वाजतापर्यंत होईल. कार्यक्रमात गुरूद्वारा सिंग सभेचे हजुरीरागी भाई रविंदरसिंग, विजयसिंग, महिंदरसिंग यांचे शबद, किर्तन, प्रवचन होणार आहे. कार्यक्रमाचे समापनप्रसंगी ‘गुरू का लंगर’चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता गुरूसिंग सभेचे अध्यक्ष रामिंदरसिंग छतवाल तसेच सर्व पदाधिकारी आणि जसवंतसिंग मल्ली, गुरूचरणसिंग बेदी, जगजीतसिंग विरक, इन्दरजीतसिंग गुजराल, प्रकाश सराफ, कैलास हिवराळे, अमरीकसिंग राठोड आदि परिश्रम घेत आहे. सर्व हिन्दु सिक्ख धर्मप्रेमी बांधवानी या प्रसंगी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा.‌असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आयोजन समिती तर्फे गुरमितसिंग गोसल यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

अर्थसंकल्पातून ‘चाहूल’ ! देश एका मोठ्या संकटाकडे : एक उच्चाधिकार समिती स्थापन होईल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये काही खास घोषणा नसल्या तरी अर्थमंत्र्यांनी केलेली एक घोषणा आश्चर्यकारक वाटणारी आहे. लोकसंख्या...

अकोला इंडस्ट्रीज असोसीएशनतर्फे अमृत महोत्सवी गणतंत्र दिवस साजरा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : व्यवसाय आणि उद्योगात जरी विविधता असली तरी आमच्या एकजुटीताने अकोला औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी सहकार्यानेच अकोला जिल्हा विकासाकडे...

खरा सवाल ! रामललाच्या जुन्या स्वयंभू मूर्तीचे काय होणार? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे पत्र

अकोला दिव्य न्युज ब्युरो : श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख जवळ येत आहे. पण, देशातील चार शंकराचार्यांनी या सोहळ्याला विरोध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

अकोल्यात विना वारसदारांची संपत्ती लूटणारी टोळी सक्रीय ! बनावट मृत्यूपत्र व खोटी तक्रारींचा आधार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू वस्तीतील वारसदार नसलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनावट दस्तावेज करून हडपणारी टोळी अकोल्यात...

बच्चू कडू यांच्यासाठी चक्क कायद्यात बदल ! हा निर्णय सहकार चळवळीच्या मुळावर उठणारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद...

भाजप व्यापारी आघाडी प्रदेश समन्वयकपदी हरीश आलिमचंदाणी यांची निवड

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील व्यापार उद्योग क्षेत्रातील विविध समस्या व त्यावरील उपाय योजना लागू करण्यासाठी कार्यरत भारतीय जनता पार्टी व्यापारी...

आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक ! वंचित बहुजन आघाडीचा प्रतिनिधी सहभागी होणार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याकरता आणि अंतिम निर्णय घेण्याकरता आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक आयोजित...

Recent Comments

error: Content is protected !!