Saturday, May 18, 2024
Home ताज्या घडामोडी नागपूरात रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात ! विधिमंडळाकडे जाताना कारवाई

नागपूरात रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात ! विधिमंडळाकडे जाताना कारवाई

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचा आज राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे समारोप झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समारोपावेळी भाषण करत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीकेची झोड उठवली. तसंच शेतकरी आणि युवांच्या प्रश्नांबाबत आमच्या काही मागण्या आहेत. त्यामुळे या मागण्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारने आपला एक प्रतिनिधी इथं पाठवावा, अशी मागणी रोहित पवार यांच्याकडून आपल्या भाषणात वारंवार केली जात होती.

मात्र युवा संघर्ष यात्रेची समारोप सभा पार पडल्यानंतरही कोणताही सरकारी प्रतिनिधी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने रोहित पवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह विधिमंडळाकडे निघाले होते. मात्र विधिमंडळाकडे जात असतानाच पोलिसांनी रोहित पवार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आल्याने परिसरात प्रचंड तणाव आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. ताब्यात घेण्यात आल्यानंतर रोहित पवार आणि इतर कार्यकर्त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, “राज्यभरातील युवांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेची धास्ती घेऊन पळ काढणाऱ्या आणि पोलिसांना पुढं करुन बळाचा वापर करणाऱ्या या गोंधळलेल्या, निकामी आणि पळकुट्या सरकारचा तीव्र धिक्कार आणि निषेध,” अशी पोस्ट नागपुरातील राड्यानंतर रोहित पवार यांच्या ‘एक्स ‘अकाऊंटवर लिहिण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

पंतप्रधान मोदी म्हणतात,आमच्या घरीही ईद साजरी व्हायची ! माझ्या घरी सर्व मुस्लिम कुटुंबातून जेवण यायचे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : माझ्या घराभोवती सर्व मुस्लिम कुटुंबे होती. आमच्या घरीही ईद साजरी व्हायची. इतर सणही साजरे केले जायचे. ईदच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!