Saturday, May 18, 2024
Home राजकारण आणखी ४९ खासदारांचं निलंबन; सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंचाही समावेश!

आणखी ४९ खासदारांचं निलंबन; सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हेंचाही समावेश!

अकोला दिव्य न्युज ब्युरो : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज पुन्हा ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी चार तरुण लोकसभा सभागृहात घुसल्यानंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या मुद्द्यावरूनच लोकसभा आणि राज्यसभेतही विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. सुरक्षेच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक झालेल्या खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरू असून आतापर्यंत जवळपास १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

लोकसभेतून आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावश आहे. तसंच शशी थरूर, डिंपल यादव, कार्ती चिदंबरम यांच्यासह एकूण ४९ खासदारांना हिवाळी अधिवेशन काळापुरतं निलंबित करण्यात आलं आहे. खासदारांचं निलंबन करून सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असून सकाळपासून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह विविध खासदार संसद परिसरात सरकारविरोधात आंदोलन करत आहेत.

खासदारांच्या निलंबनाचा काल विक्रम

खासदारांच्या निलंबनात इतिहास रचत नव्या संसदेने काल एकाच दिवशी लोकसभेच्या ३३ आणि राज्यसभेच्या ४५ खासदारांना निलंबित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेत कठोर नियमांचे पालन करण्याबाबत भाष्य केले होते. या निलंबनाकडे त्या दृष्टीने पाहिले जात आहे. काही दिवसांपूर्वीही १४ खासदारांना निलंबित केले होते.

संसदेतील घुसखोरीच्या मुद्द्यावरून सोमवारीही संसदेत मोठा गदारोळ झाला होता. कामकाज सुरू होताच लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली हाेती. 

RELATED ARTICLES

मोठी बातमी : BJP सरकार अल्पमतात ! हरियाणातील 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली : काँग्रेसला दिला पाठिंबा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा झटका बसला आहे. हरियाणातील भाजप सरकारवर मोठे संकट कोसळले आहे. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे मुख्यमंत्री...

केजरीवालांच्या चौकशीची नायब राज्यपालांकडून मागणी ! ‘आप’ने खलिस्तानवाद्यांकडून निधी घेतला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई सुरू असतानाच आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला...

मोठी बातमी : लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अडकलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएसचे नेते एचडी रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!