अकोला दिव्य न्युज ब्युरो : व्यवसाय आणि उद्योगात जरी विविधता असली तरी आमच्या एकजुटीताने अकोला औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी सहकार्यानेच अकोला जिल्हा विकासाकडे अग्रेसर होत आहे. असे प्रतिपादन अकोला इंड अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद सचिव नितीन बियाणी यांनी केले. देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी गणतंत्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते.
अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयात, गणतंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला संघटनेचे उद्योजक सदस्य कांतिलाल गोरसीया यांनी हार अर्पण केले, तसेच अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य विनोद चोपडे यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे पुतळ्याला हार अर्पण करून मानवंदना देण्यात दिली.
‘भारत माता की जय’चा नारा देत ध्वजारोहण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज खंडेलवाल यांच्या हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद सचिव नितीन बियाणी, सह-सचिव निखिल अग्रवाल, कोषाध्यक्ष रितेश गुप्ता, तसेच कार्यकारिणी सदस्य कमलेश अग्रवाल, विष्णू खंडेलवाल, गोपाल भाला, अजय खंडेलवाल, किरीट मंत्री, संजय साबद्रा, राजेश जैन, श्रेयांस जैन, केशव खटोड, पंकज राठी, शैलेश पाटील, संजय अग्रवाल, विठ्ठल पोहनकार, जयेश वोरा, तुळशीराम तळोकार, मुकेश राठी, विशाल सोमाणी, रामनरेश प्रजापती, अखिलेश पांडेयसह इतर कार्यकारिणी सदस्य व उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानद सचिव नितीन बियाणी यांनी सांभाळून आभार व्यक्त केले.