Wednesday, February 21, 2024
Home राष्ट्रीय अर्थसंकल्पातून 'चाहूल' ! देश एका मोठ्या संकटाकडे : एक उच्चाधिकार समिती स्थापन...

अर्थसंकल्पातून ‘चाहूल’ ! देश एका मोठ्या संकटाकडे : एक उच्चाधिकार समिती स्थापन होईल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये काही खास घोषणा नसल्या तरी अर्थमंत्र्यांनी केलेली एक घोषणा आश्चर्यकारक वाटणारी आहे. लोकसंख्या नियंत्रण आणि लोकसंख्या बदलाचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. देशाची लोकसंख्या १४३ कोटींपेक्षा अधिक आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, संकटांवर ही समिती केंद्र सरकारला माहिती देणार आहे.

भारतासमोर मोठ्या लोकसंख्येचे संकट उभे ठाकणार आहे. कमी होत चाललेली शेतीची उत्पादनक्षमता, बेरोजगारी, पायाभूत सुविधा, घरे आदी अनेक गोष्टींची तूट येत्या काळात भासणार आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची भूक कशी मिटवायची, पाणी कसे पुरवायचे आदी गोष्टी सरकारसमोर आवासून उभ्या राहणार आहेत. या आव्हानांचा लेखाजोखा मांडण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात येणार आहे.

लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्येतील बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार एक उच्चाधिकार समिती स्थापन करेल. या समितीला उच्च अधिकार असतील. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ही समिती आपल्या शिफारशीही सरकारला देईल. सामाजिक बदल लक्षात घेऊन सरकार हा प्रस्ताव तयार करत असल्याचे सीतारामन म्हणाल्या. 

वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याचा मुद्दा जोरात सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही मांडला जात आहे. लोकसंख्येचे असंतुलन झाले तर देशासमोर मोठी गंभीर परिस्थिती उभी राहिल. जिकडे रोजगार मिळतायत, अन्न पाण्याची सोय़ होतेय तिकडे हे लोंढेच्या लोंढे स्थलांतरीत होऊन तेथील व्यवस्थाही बिघडवू शकतात. यामुळे सरकार आतापासून सावध झाले आहे. 

RELATED ARTICLES

अकोला इंडस्ट्रीज असोसीएशनतर्फे अमृत महोत्सवी गणतंत्र दिवस साजरा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : व्यवसाय आणि उद्योगात जरी विविधता असली तरी आमच्या एकजुटीताने अकोला औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी सहकार्यानेच अकोला जिल्हा विकासाकडे...

खरा सवाल ! रामललाच्या जुन्या स्वयंभू मूर्तीचे काय होणार? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे पत्र

अकोला दिव्य न्युज ब्युरो : श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख जवळ येत आहे. पण, देशातील चार शंकराचार्यांनी या सोहळ्याला विरोध...

अकोल्यातील दोन्ही ऑक्सिजन प्लॅंट देखील बंदच ! कोट्यावधी रुपये पाण्यात : स्पेशल ऑडिट करा

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : करोनाकाळात अकोल्यात लावण्यात आलेले पीएसए तंत्रज्ञानावर दोन्ही ऑक्सिजन प्लॅंट मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने, ऑक्सिजन...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

नवे आंदोलन ! सरकारची डोकेदुखी वाढणार: जरांगे पाटलांकडून मोठी घोषणा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : जोपर्यंत कुणबी नोंदींबाबत काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक...

बुलडाणा जिल्ह्यात ४०० जणांना विषबाधा ! सप्ताहानिमित्त भगर व आमटीचे भाविकांना वाटप

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सप्हातानिमित्त करण्यात आलेल्या भगर, आमटीच्या प्रसादातून सुमारे ४०० जणांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री घडली....

रेडिओवरील ‘बहनों और भाईयो’ चा प्रसिद्ध आवाज हरपला !अमीन सयानी यांचे निधन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शैलीदार आणि रसाळ निवेदनाने संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचे मंगळवारी रात्री रुग्णालयात निधन...

सत्य स्वीकारण्याचा ‘प्रामाणिकपणा’ आहे ? ‘उडदामाजी काळेगोरे’ हेच काय ते सत्य

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातापासून शंभरभर किलोमीटर पेक्षाही कमी अंतरावर असलेले संदेशखाली हे मागास ठिकाण. त्या...

Recent Comments

error: Content is protected !!