अकोला दिव्य न्युज ब्युरो : जिल्हा स्तरीय टेनिस क्रिकेट व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये सन्मित्र पब्लिक स्कूलच्या टेनिस क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट या दोन्ही संघांनी विजय मिळवीत विभागीय स्तरावर निवड होण्याचा बहुमान पटकावला.

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल समिती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला द्वारा जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धांत टेनिस क्रिकेट व टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये सन्मित्र पब्लिक स्कूलचा संघ टेनिस क्रिकेट मध्ये विभागीय स्तरावर निवडल्या गेला आहे
त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी प्रथमेश तायडे, ऋषी तंबोली, सुजल पवार, सम्यक इंगळे, ब्रिजेश गवई, सम्यक तायडे, प्रणव अघडते, अभिजित डोंगरे, गणेश सांगळे, किशन कसबेकर, प्रणव ढेगळे व आश्रय ढोक यांचा समावेश आहे.
त्याच प्रमाणे टेनिस बॉल क्रिकेट प्रकारातही दुसरा संघ विजयी होऊन विभागीय स्तरासाठी पात्र झाला आहे.त्यामध्ये ऋषी तांबोळी, सम्यक तायडे, प्रथमेश तायडे, सम्यक इंगळे, रोहित अहिर,ब्रिजेश गवई, प्रणव ढेगळे,प्रणव अघडते, गणेश सांगळे, अंश धवणे, आश्रय ढोक आणि कार्तिक दुबे या खेळाडूंचा समावेश आहे.

दोन्ही संघाना विद्यालयाचे शारीरिक शिक्षक गाढे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.विजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रदिपसिंह राजपूत आणि विद्यालयाच्या प्राचार्या मनिषा राजपूत यांनी अभिनंदन केले आहे आणि विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत .