Saturday, May 18, 2024
Home ताज्या बातम्या भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती

भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतदानाची जनजागृती वाढली आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांनाही यानिमित्ताने आवाहन केलं जात आहे. अनेक महाविद्यालयातही जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. परंतु, बोरीवलीतील ठाकूर महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे चिरंजीव ध्रुव गोयल प्रमुख पाहुणे असलेल्या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थांना जबरदस्तीने सहभागी होण्यास भाग पाडले असल्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय. यावरून आता विरोधकांनी निशाणा साधला आहे.सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमध्ये विद्यार्थ्याने दावा केला आहे की त्यांची ओळखपत्रे जप्त करून त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यास भाग पाडण्यात आलं आहे. ज्या पद्धतीने त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यास भाग पाडले गेले आहे ती लोकशाही आहे का, असा संतप्त सवालही या विद्यार्थ्याने धुव्र गोयल यांच्यासमोर विचारला.

ध्रुव गोयल यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मतदानाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, तुमचे पहिले मत हे खरे मत असेल. तुमच्या आई-वडिलांना, तुमच्या भावंडांचा तुमच्यावर प्रभाव पडू देऊ नका. ते मत तुमचे मत आहे आणि ते तुमच्याकडून आले पाहिजे. ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. एक्स किंवा वाय पक्षाला मत द्या हे सांगण्यासाठी मी येथे आलेलो नाही.दरम्यान, या प्रकरणी महाविद्यालयाची अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. तसंच, कार्यक्रमानंतर या विद्यार्थ्यांवर प्राचार्यांनी संतापही व्यक्त केल्याचं म्हटलं जातंय.

RELATED ARTICLES

अकोल्यातील कॉंग्रेसचे साजिद खान पठाणवर गुन्हा दाखल ! मौलवींना शिवीगाळ व ॲड. आंबेडकरांना अपशब्द वापरले

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी यांना शिवीगाळ करून ॲड. प्रकाश आंबेडकरांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेसचे साजिद खान पठाण यांच्यावर...

मोठी बातमी ! भाजपला 233 जागा तर एनडीएला 268 : महाराष्ट्रात NDA ला 20 जागांचा फटका ; योगेंद्र यादव यांचं भाकित

अकोला दिव्य न्युज ब्युरो : yogendra yadav prediction on bjp : सध्याच्या लोकसभा निवडणुकीच विश्लेषण करीत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी त्यांच्या...

Big News ! केजरीवालांना दिलासा : सर्वोच्च न्यायालयाकडून १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Kejariwal Interim Beail अकोला दिव्य न्युज ब्युरो: दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!