Saturday, May 18, 2024
Home महाराष्ट्र वाचा संपूर्ण यादी ! ठाकरेंच्या शिवसेनेचे २१ उमेदवार जाहीर

वाचा संपूर्ण यादी ! ठाकरेंच्या शिवसेनेचे २१ उमेदवार जाहीर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची शकलं झाली आहेत. भाजपाने आत्तापर्यंत २३ उमेदवार जाहीर केले आहेत. तसंच शिवसेना व राष्ट्रवादीनेही उमेदवार जाहीर केले आहेत. तर महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेने २१ उमेदवार जाहीर केले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाने १७ जणांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता चार नावांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत चार नावांची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. वैशाली दरेकर या कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात लढणार आहेत. हातकणंगलेतून सत्यजीत पाटील, पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कोण कोण?
१) नरेंद्र खेडकर- बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ
३) संजोग वाघेरे-पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टीकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजीनगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाई वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
१२) राजन विचारे-ठाणे
१३) संजय दिना पाटील-मुंबई-ईशान्य
१४) अरविंद सावंत-मुंबई-दक्षिण
१५) अमोल किर्तीकर-मुंबई-वायव्य
१६) अनिल देसाई-मुंबई, दक्षिण मध्य
१७) संजय जाधव-परभणी
१८) वैशाली दरेकर-कल्याण
१९)सत्यजीत पाटील-हातकणंगले
२०) करण पवार-जळगाव
२१) भारती कामडी-पालघर

RELATED ARTICLES

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर ! 10 जुनला मतदान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : येत्या ७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार...

मोदींना आता ‘त्या’ घोटाळेबाजांचा प्रचार करावा लागणार? किरीट सोमय्या तोंडघशी पडले !

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुंबईतील सहा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील प्रचाराला वेग...

महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणुका 

पहिला टप्पा - १९ एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर. दुसरा टप्पा २६ एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!