Saturday, May 18, 2024
Home राजकारण बुलढाण्यात चमत्कार घडणार ! सात दशकांत यंदा अपक्ष विजयाचा गुलाल उधळणार

बुलढाण्यात चमत्कार घडणार ! सात दशकांत यंदा अपक्ष विजयाचा गुलाल उधळणार

अकोला दिव्य टीम : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या मागील तब्बल ६७ वर्षांचा इतिहास लक्षात घेतला तर मतदारांनी प्रमुख राजकीय पक्षांच्याच उमेदवारानाच आपला कौल दिल्याचे स्पष्ट होते . रिंगणात असलेल्या अपक्ष उमेवारांना बुलढाण्यातील मतदारांनी नेहमीच दुर्लक्षित केले आहे. यामुळे यंदा अपक्ष उमेदवार निवडून येणार काय ? याची खमंग चर्चा मतदारसंघात होत आहे.

सन १९५२ ते २०१९ दरम्यान झालेल्या बुलढाणा लोकसभा लढतीत एकाही अपक्ष उमेदवाराला विजय मिळविता आला नाहीये! रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांना जिल्हावासीयांनी आजवर गांभीर्याने घेतले नाही. काही लढतीत १० पेक्षा जास्त तर १९९१ च्या लढतीत तब्बल वीसेक अपक्ष असूनही आजवर मतदारांनी त्यांना पाठबळ देण्याचे टाळले. मात्र आजवरच्या दीर्घ काळात कोणताही प्रबळ नेता अपक्ष म्हणून मैदानात उतरला नाही, असाही इतिहास आहे.

यंदाच्या निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी हवा केली आहे. त्यामुळे यंदाची लढत तिरंगी ठरली आहे. मात्र ही हवा शेवटपर्यंत कायम राहते का? शेतकऱ्यांची सहानुभूती मतात परिवर्तित होते का?? यावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे. आमची लढत युतीशीच आणि विजय आमचाच असे दावे करीत आहे. त्यांचे दावे, मनसुबे खरे ठरतात का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

१९५२ पासूनचे खासदार

दोन खासदार -आबासाहेब खेडकर, लक्ष्मणराव भटकर (काँग्रेस).
१९५७ ,१९६२, १९६७ शिवराम राणे
१९७१ .यादव, महाजन ( दोन्ही काँग्रेस),
१९७७ दौलत गवई (खोरिपा)
१९८० बाळकृष्ण वासनिक,
१९८४ मुकूल वासनिक (काँग्रेस) १९८९ सुखदेव नंदाजी काळे (भाजप)
१९९१ मुकूल वासनिक (काँग्रेस) १९९६आनंदराव अडसूळ (शिवसेना)
१९९८मुकूल वासनिक (काँग्रेस) *१९९९आनंदाराव अडसूळ
*२००४ आनंदराव अडसूळ *२००९, २०१४,२०१९ प्रतापराव जाधव (*दोन्ही शिवसेना).

RELATED ARTICLES

मोठी बातमी : BJP सरकार अल्पमतात ! हरियाणातील 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली : काँग्रेसला दिला पाठिंबा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा झटका बसला आहे. हरियाणातील भाजप सरकारवर मोठे संकट कोसळले आहे. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे मुख्यमंत्री...

केजरीवालांच्या चौकशीची नायब राज्यपालांकडून मागणी ! ‘आप’ने खलिस्तानवाद्यांकडून निधी घेतला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई सुरू असतानाच आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला...

मोठी बातमी : लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अडकलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएसचे नेते एचडी रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!