Saturday, October 5, 2024
Homeताज्या बातम्याअकोला जिल्ह्याच्या विकासासाठी बदल करा ! डॉ. अभय पाटील यांना विजयी करा:...

अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी बदल करा ! डॉ. अभय पाटील यांना विजयी करा: खा. वासनिक यांचे आवाहन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : गेल्या दहा वर्षात वाढलेली महागाई आणि भ्रष्टाचाराने सर्व सामान्य व्यक्ती त्रासली असून अकोला जिल्ह्याचा विकास खुंटला आहे.तेव्हा आपल्या अकोला लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मतदानाचे विभाजन करण्याचे षडयंत्र हाणून पाडा.नव्या दमाचे आणि सर्वांच्या सुख-दुःखात धाऊन येणारे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय काशिनाथ पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असं आवाहन अ.भा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, माजी केंद्रीय मंत्री, खा मुकुल वासनिक यांनी केले.

पातूर येथील प्रचारसभेत खा.वासनिक बोलत होते.मोदी सरकारच्या बेबंदशाहीवर घणाघाती हल्लाबोल करताना वासनिक म्हणाले की, या दहा वर्षात राष्ट्रीय प्रगती सातत्याने खुंटली असून अराजकता निर्माण होत आहे. हे सर्व बदलण्यासाठी काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी हाच एकमेव पर्याय असून अकोला लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांना मोठ्या संख्येने विजयी करा, यंदा मोदी सरकारचा सपशेल पराभव दिसत आहे. सभांना होणारी गर्दी बघून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.अशी कोपरखळी वासनिक यांनी केली.

यावेळी माजी आ लक्ष्मणराव तायडे, माजी आ नातिकोद्दीन खतीब, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आ.नितीन देशमुख, अ.भा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आशीष दुवा, प्रदेश नेते नाना गावंडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी प्रकाश तायडे, प्रभाताई ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, सय्यद मुजाहिद, बंटी गहलोत, विजय अंभोरे, श्याम उमाळकर, लुकमान ठेकेदार, प्रमोद डोंगरे, हाजी सै बुर्हानु,सै कमरुद्दीन, हिदायत खान, मुख्तार शेख अहमद, महेंद्र गवई यांची उपस्थिती होती.

या सभेत शरदचंद्र पवारचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे,आ नितीन देशमुख, सै कमरुद्दीन, शिवाजीराव मोघे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन डॉ.अभय पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. प्रास्तविक प्रकाश तायडे तर संचालन मुख्तार शेख आणि आभार प्रदर्शन चंद्रकांत बारताशे यांनी केले. यावेळी राजेश ठाकरे, निरंजन बंड, रुस्तम शाह, गुड्डू पैलवान, राजेश गावंडे समवेत पातुर, बाळापूर तालुक्याच्या प्रत्येक गावातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,आम आदमी पार्टी, भीमशक्ती आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!