Saturday, May 18, 2024
Home संपादकिय विदर्भात धोक्याची घंटा ! फटका नेमका कुणाला ? नागपूरात ५१.५४ टक्केच...

विदर्भात धोक्याची घंटा ! फटका नेमका कुणाला ? नागपूरात ५१.५४ टक्केच : राजकारणाचा स्तर घसरल्याने निरुत्साह !

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी देशापासून गावपातळीवर, सर्वच स्तरातून जनजागृती करुनही लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पुर्व विदर्भातील 5 मतदान मतदारसंघातील कमी झालेली टक्केवारीने सर्वच उमेदवारांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. याचा फटका नेमका कुणाला बसणार यावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये विचारमंथन सुरु झाले. तर राज्यातील राजकारणाचा स्तर घसरल्याने निरुत्साह वाढला, असे निष्कर्ष काढला जातो आहे. मतदानाचा हा ट्रेंड जर 26 एप्रिलला होणार असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानातही कायम राहतो काय ? सर्वांत मोठा धक्का नागपूर व लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी दिला आहे. सर्वांत जास्त सुशिक्षित मतदार असलेल्या नागपुर मतदारसंघातील टक्केवारीही 5 मतदारसंघात सर्वात कमी तर दुर्गम व सर्वाधिक निरक्षर असलेल्या गडचिरोलीत सर्वात जास्त मतदानाने सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे.

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. मात्र पूर्व विदर्भातील पाचही मतदारसंघांत सरासरी ५७.८२ टक्के मतदानाची नोंद झाली. भारतभर रस्ते विकासपुरुष’ अशी ओळख असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा संपूर्णत: शहरी असलेल्या नागपूर मतदारसंघात २०१९ मध्ये ५४.९४ टक्के मतदान झाले होते. तर काल झालेल्या निवडणुकीत येथे टक्केवारी वाढली नाही तर उलट ३.४० टक्क्यांनी कमी झाली आहे. फक्त ५१.५४ टक्के एवढे मतं नोंदवले गेले होते. उन्हाचा कहर हे त्यामागचे कारण असे सर्वसाधारण मत व्यक्त केले जात असले तरी गडकरींच्या ‘विकास संकल्पने’ला नकार हे कमी मतदानाचे कारण असल्याचाही मतदारसंघात मत प्रवाह आहे. पक्ष स्थितीत बदल करायचा नसेल तर मतदार निरुत्साही असतो, असे कारण देत आमचीच मंडळी मतदानासाठी बाहेर पडली असा दावा गडकरी समर्थक करीत आहेत.या विपरीत सर्वाधिक मतदानाची नोंद नक्षलप्रभावित गडचिरोली-चिमूर मतदारसंघात६६.३० टक्के मतदान झाले आहे. परंतु तेही गेल्या वेळी नोंदविलेल्या ७२.३३ टक्क्यांपेक्षा कमीच आहे.

महाराष्ट्राच्या शहरी भागातील मतदार मतदानाचे कर्तव्य न निभावता गावाबाहेर जातात याकडे लक्ष वेधले जाते आहे. निवडणूक आयोग वेळापत्रक ठरत असताना या वास्तवाकडे काही अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले होते. रामटेकमध्ये ५५.४६ टक्के मतदान झाले असले तरी गत निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी दहा टक्क्याने घसरली. तेथे मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच रिंगणात नव्हता. भंडाऱ्यात सध्याच्या आकडेवारीनुसार मतदान गेल्या वेळच्या ६८.८१ टक्क्यांवरून ५६.८७ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. चंद्रपुरात तगडी झुंज असतानाही मतदान नऊ टक्क्यांनी घसरले.भंडारा-गोंदियात ६१.३७ टक्के आणि चंद्रपूरमध्ये ५७.९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात पाच वर्षांत मतदानाच्या घसरलेली टक्केवारीतून मतदारांनी राजकीय पक्ष आणि रिंगणातील उमेदवारांच्या राजकीय भवितव्यासाठी धोक्याची घंटा का वाजवली आहे? अलिकडच्या काळात नैतिकता आणि राजकीय संकेत झुगारून झालेली फोडाफोडी व निम्नपातळीवरील आरोपांनी राज्यातील राजकारणाचा स्तर घसरल्याने मतदारांमध्ये निरुत्साह वाढल्याचा हा परिपाक आहे का? सर्वच राजकीय पक्षांमध्ये विचारमंथन सुरु झाले असले तरी हे मंथन विजय आणि पराजय यादृष्टीने होत आहे. पुर्व विदर्भातील मतदारांसारखी मानसिकता जर पश्चिम विदर्भातील मतदारांची आहे का? याचा मागोवा घेणं आजच्या काळाची गरज आहे. तुर्तास एवढेच !

RELATED ARTICLES

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

खरं काय अन् खोटं का ? मुस्लिम लोकसंख्येला राजकीय गंध ! ‘या’ दोन गोष्टींचा बागुलबुवा केला की…

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : ग्रामपंचायतीपासून तर लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रचार काळात प्रतिस्पर्ध्यांवर वार-पलटवार करणे, उणे दुणे काढून एकमेकांना टोले...

भाजप बहुमतपासून दूर ? मोदींचा टप्प्यागणिक भरकटलेला प्रचार आणि चार टप्प्यासाठी केजरीवालही मैदानात

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोकसभेची निवडणूक आता उत्तरेकडे सरकू लागली असून टप्प्यागणिक भाजपच्या प्रचाराची दिशा बदलत आहे. प्रचाराच्या शुभारंभाचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!