Saturday, May 18, 2024
Home राजकारण भारताला मोठा धक्का ?  मालदीवमध्ये चीन समर्थक मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाचा दणदणीत...

भारताला मोठा धक्का ?  मालदीवमध्ये चीन समर्थक मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाचा दणदणीत विजय

“मालदीवमध्ये रविवारी झालेल्या संसदीय निवडणुकीत चीन समर्थक मानले जाणारे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. मुइज्जू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) पक्षाची दोन तृतियांशी बहुमताच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार ९३ सदस्यीय सभागृहातील आतापर्यंत ८६ जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये मुइज्जू यांच्या पक्षाला तब्बल ६६ जागा मिळाल्या आहेत. तर ६ जागांवर अपक्ष उमेवार निवडून आले आहेत. उर्वरित ७ जागांवरील निकाल जाहीर व्हायचे बाकी आहेत. मात्र आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये मुइज्जू यांच्या पक्षाला मिळालेल्या ६६ जागा ह्या बहुमताचा आकडा असलेल्या ४७ जागांपेक्षा १९ ने अधिक आहेत.

मालदीवच्या संसदेमध्ये आतापर्यंत मुइज्जू यांचा विरोधी पक्ष असलेल्या सोलिह यांच्या मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीकडे ४४ सदस्यांसह बहुमत होतं. संसदेत बहुमत नसल्याने मुइज्जू  यांना नवे कायदे बनवण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता निवडणुकीतील मोठ्या विजयासह संसदेत बहुमत मिळाल्याने मुइज्जू यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाला मिळालेला विजय हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच मालदीवमधील जनता ही भारतासह अन्य कुठल्याही देशाशी असलेल्या जवळीकीपेक्षा राष्ट्रपतींच्या चीनसोबत असलेल्या घनिष्ठ संबंधांची पाठराखण करत आहे, असा या निकालांचा सर्वसाधारण अर्थ निघत आहे. मोहम्मद मुइज्जू हे गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये विजयी होऊन  राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले होते. त्यांनी आपल्या प्रचार मोहिमेदरम्यान, मालदीवचं इंडिया फर्स्ट धोरण संपुष्टात आणण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यावर त्यांनी त्या दिशेने पावलंही टाकली होती. आता जनतेनेही या निकालांमधून त्यांच्या धोरणावर शिक्कामोर्तब केल्याचं दिसत आहे. 

RELATED ARTICLES

मोठी बातमी : BJP सरकार अल्पमतात ! हरियाणातील 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली : काँग्रेसला दिला पाठिंबा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा झटका बसला आहे. हरियाणातील भाजप सरकारवर मोठे संकट कोसळले आहे. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे मुख्यमंत्री...

केजरीवालांच्या चौकशीची नायब राज्यपालांकडून मागणी ! ‘आप’ने खलिस्तानवाद्यांकडून निधी घेतला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई सुरू असतानाच आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला...

मोठी बातमी : लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अडकलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएसचे नेते एचडी रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!