Sunday, May 5, 2024
Home ताज्या घडामोडी अमरावतीमध्ये राडा ! सायन्स कोर मैदानाचवर बच्चू कडूंची पोलिसांकडून मुस्कटदाबी :...

अमरावतीमध्ये राडा ! सायन्स कोर मैदानाचवर बच्चू कडूंची पोलिसांकडून मुस्कटदाबी : ठिय्या आंदोलन सुरू

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून वाद सुरू आहेत. अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून वाद सुरू आहेत. त्यातच २३ आणि २४ एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात बच्चू कडूंना उमेदवार दिनेश बुब यांच्या सभेसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र त्याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना नियमानुसार दिलेली परवानगी सुरक्षेचे कारण देऊन रद्द करण्यात आली आणि त्यानंतर या मैदानावर आता अमित शाह यांची सभा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

Oplus_131072

बच्चू कडू यांचा दावा काय?

अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावरून बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य आमनेसामने आले आहेत. अमित शाह यांची उद्या सभा होणार असल्यामुळे याठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आज बच्चू कडू त्यांच्या सभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांसह येथे आले असताना त्यांना पोलिसांनी आत जाण्यास मज्जाव केला. आमच्याकडे निवडणूक आयोगाची परवानगी असतानाही आमची अडवणूक का करत आहात? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. तसेच पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता बच्चू कडू पोलिसांवरच संतापले. पोलीस भाजपाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे आमची समजूत काघालत आहेत? अमित शाह यांच्या सभेसाठी जर परवानगी मिळाली असेल तर त्यांनी ती दाखवावी, अन्यथा ज्यांना परवानगी मिळाली आहे, त्यांना सभा घेऊ द्यावी, असे बच्चू कडू म्हणाले. मात्र पोलिसांनी सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना मैदानात येऊ दिले नाही.

पोलिसांसमोरच आयोगाच्या परवानगीचं पत्र फाडलं

पोलीस आपले ऐकत नाहीत, हे पाहिल्यानंतर बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाने दिलेले परवानगीचे पत्र पोलिसांसमोरच फाडून टाकले. पोलिसांनी आपल्या गळ्यात भाजपाचा पट्टा घालावा आणि गाडीवर भाजपाचे झेंडे लावावेत, अशीही टीका बच्चू कडू यांनी केले. भाजपाच्या सांगण्यावरून पोलीस काम करत असून आम्हाला मैदानाबाहेर काढले जात आहे, असाही आरोप बच्चू कडू यांनी केला.

प्रकरण काय आहे?

अमरावतीच्या सायन्स कोअर मैदानावर २१ आणि २२ एप्रिल रोजी नवनीत राणा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. तर बच्चू कडू यांना २३ आणि २४ एप्रिलसाठी परवानगी मिळाली होती. त्यासाठी रितसर पैसेही भरण्यात आले होते. मात्र अमित शाह यांचा दौरा २४ एप्रिल रोजी ठरल्यामुळे पोलिसांनी बच्चू कडू यांना मैदानावर येऊ दिले नाही.

Oplus_131072
RELATED ARTICLES

अँड उज्ज्वल निकमांनी करकरेंना लागलेल्या गोळीचे सत्य न्यायालयापासून लपवलं ! वडेट्टीवार यांच विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती आणि आताचे भाजपाचे उत्तर मध्य मुंबईतील...

राहुल गांधी यांनी रायबरेली का निवडले ? प्रियांका निवडणूक का लढत नाहीत ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि देशाच्या मीडियाने अवघा माहोल करून टाकलेल्या उत्तर प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित अमेठी आणि रायबरेलीतून उमेदवार...

शेवटी भाजपाकडून ब्रिजभूषण शरण सिंहांच्या मुलाला लोकसभेचं तिकीट ! रायबरेलीत दिनेश प्रताप सिंह

अकोला दिव्य न्युज ब्युरो : उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचं तिकीट कापलं आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

अँड उज्ज्वल निकमांनी करकरेंना लागलेल्या गोळीचे सत्य न्यायालयापासून लपवलं ! वडेट्टीवार यांच विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती आणि आताचे भाजपाचे उत्तर मध्य मुंबईतील...

राष्ट्रीय पातळीवर श्री समर्थ कोचिंग क्लासेसचा नावलौकिक !जेईई मेन परिक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पश्चिम विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या मुलभूतरित्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर व ख्यातनाम अकोल्यातील श्री समर्थ कोचिंग क्लासेसच्या...

अकोल्यातील अल्पवयीन मुलीची धर्मांतरानंतर एक लाखांत राजस्थानात विक्री; आईसह टोळी जेरबंद

Akola crime:अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला येथील एका अल्पवयीन मुलीची धर्मांतर करून तिचा राजस्थानातील तरुणाशी यवतमाळात विवाह लावून देत एक लाख...

मोठी बातमी : लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये अडकलेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएसचे नेते एचडी रेवन्ना यांना कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास...

Recent Comments