Friday, September 20, 2024
Homeताज्या बातम्याआता पर्यंत 42 टक्के मतदान ! बाळापूर विधानसभेत 45 टक्के तर अकोला...

आता पर्यंत 42 टक्के मतदान ! बाळापूर विधानसभेत 45 टक्के तर अकोला पश्चिमेला 38 टक्के: आता 3 तास शिल्लक

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिलला पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा यवतमाळ-वाशिम आणि वर्धा या पाचही मतदारसंघात सुरू असलेल्या मतदानात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात सकाळी 6 वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही मतदान केंद्रावर ब-या पैकी गर्दी होती.तर काही मतदान केंद्रावर बोटावर मोजता येतील इतकेच मतदार दिसून आले.सकाळी 7 वाजता सुरू झालेल्या मतदानाची टक्केवारी ठिक 11 वाजता अवघी 17.39 एवढीच होती. विशेष म्हणजे या कालावधीत वातावरण आल्हाददायक होते. तरीही मतदान कमी झाल्याने मतदारांमध्ये निरुत्साह असल्याचे संकेत मिळत असताना, दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात आलेली मतदानाची टक्केवारी दिलासा देणारी ठरली. दुपारी 3 वाजेपर्यंत एकुण 42.69 टक्के मतदान झाले. अवघ्या तीन तासात मतदानाचा टक्का 25.30 एवढा वाढला आहे. आता मतदानाला अवघा 2 तासाचा कालावधी शिल्लक आहे.

दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील या पाच लोकसभा मतदारसंघांत सुरुवातीला मतदारांचा निरुत्साह आणि लग्नाचा मुहूर्त सर्वात अडचणीचा ठरते की काय?अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या निमित्ताने उमेदवारांचा जीव टांगणीवर होता. मतदारांनी लग्नाला प्राधान्य देत मतदानावर अक्षता फेकल्या असल्याने निवडणुकीचा प्रत्येक राजकीय पक्षाला असलेला अपेक्षित निकाल लागणार नाही. एकमात्र खरं आहे की मतदानाची टक्केवारी सध्या वाढली असली तरी भाजपाच्या मतदाराचे प्रमाण कमी असल्याची चर्चा आहे.‌ अकोला लोकसभा मतदारसंघातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात 3 वाजेपर्यंत सर्वात जास्त 45.29 तर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 36.46 टक्के मतदान झाले आहे.अकोट मतदारसंघात,43.42टक्के.मुर्तिजापूर.44.90 टक्के अकोला पुर्व 42.30आणि रिसोड मतदारसंघात 42.40 टक्के मतदान झाले असून या मतदानाची सरासरी 42 टक्के आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 90 हजार 814 मतदार आपल्या मतदानाचा प्रयोग करतील. या मतदारसंघात 2014 मध्ये 16 लाख 72 हजार 643 मतदार होते. 2019 मध्ये एकूण मतदार हे 18 लाख 65 हजार 169 होते. तर 2024 मध्ये यात मोठी वृद्धी होत एकूण मतदारांची संख्या थेट 18 लाख 90 हजार 814 इतकी झाली आहे. अकोला मतदारसंघात 2014 मध्ये 58 टक्के व 2019 मध्ये 60 टक्के मतदान झाले होते. अकोल्यात मतदानाची टक्केवारी ही इतकीच राहिली तर मतदार मात्र कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल. यंदा अकोल्याकडे संपूर्ण राज्याचे नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अकोल्यात मतदानाची टक्केवारी हा कळीचा मुद्दा केंद्रस्थानी राहतो की काय, हे सायंकाळी सहा नंतर स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!