Saturday, May 18, 2024
Home ताज्या घडामोडी टक्का घसरणीवर ? अकोला मतदारसंघात 11 वाजतापर्यंत 17.39 टक्के मतदान ! पश्चिम...

टक्का घसरणीवर ? अकोला मतदारसंघात 11 वाजतापर्यंत 17.39 टक्के मतदान ! पश्चिम विदर्भात निरुत्साह

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात मतदानाची टक्केवारी घसरल्याच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिलला विदर्भात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले.मात्र आज दुसऱ्या टप्प्यात अमरावती, अकोला, बुलढाणा यवतमाळ-वाशिम आणि वर्धा या पाचही मतदारसंघात सुरू असलेल्या मतदानात मतदारांचा निरुत्साह जाणवतो आहे

अकोला लोकसभा मतदारसंघात सकाळी 6 वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही मतदान केंद्रावर ब-या पैकी गर्दी होती.तर काही मतदान केंद्रावर बोटावर मोजता येतील इतकेच मतदार दिसून आले.सकाळी 6 वाजता सुरू झालेल्या मतदानाची टक्केवारी ठिक 11 वाजता अवघी 17.39 एवढीच होती. विशेष म्हणजे या कालावधीत वातावरण आल्हाददायक होते. तरीही मतदान कमी झाल्याने मतदारांमध्ये निरुत्साह असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान अकोला शहरातील बिर्ला कॉलनीतील जवळपास 500 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचे वृत्त आहे.

आज दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघांत मतदारांचा निरुत्साह कायम राहण्याचा कल असताना, आजचा लग्नाचा मुहूर्त सर्वात अडचणीचा ठरत आहे. या सर्व परिस्थितीत विदर्भातील पाच मतदारसंघांत उमेदवारांचा जीव मात्र लग्न मुहूर्ताने टांगणीवर आहे. मतदारांनी लग्नाला प्राधान्य देत मतदानावर अक्षता फेकल्या असल्याने निवडणुकीचा प्रत्येक राजकीय पक्षाला असलेला अपेक्षित निकाल लागणार नाही.एकमात्र खरं आहे की मतदानाची टक्केवारी घटली तर नुकसान आपल्यालाच अर्थात मतदाराला होते.

मतदारांचा निरूत्साह लक्षात घेऊन आणि पश्चिम विदर्भात मतदान असल्याने फडणवीस यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा फोटो वापरला. त्यांच्या अभंगाच्या ओळीची पोस्ट व्हायरल केली.या पोस्टच्या माध्यमातून फडणवीस यांनी भाजपच्या पारंपरिक मतदारांना घराबाहेर पडण्याचे एकप्रकारे आवाहनच केले आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 90 हजार 814 मतदार आपल्या मतदानाचा प्रयोग करतील. या मतदारसंघात 2014 मध्ये 16 लाख 72 हजार 643 मतदार होते. 2019 मध्ये एकूण मतदार हे 18 लाख 65 हजार 169 होते. तर 2024 मध्ये यात मोठी वृद्धी होत एकूण मतदारांची संख्या थेट 18 लाख 90 हजार 814 इतकी झाली आहे. अकोला मतदारसंघात 2014 मध्ये 58 टक्के व 2019 मध्ये 60 टक्के मतदान झाले होते. अकोल्यात मतदानाची टक्केवारी ही इतकीच राहिली तर मतदार मात्र कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल. यंदा अकोल्याकडे संपूर्ण राज्याचे नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अकोल्यात मतदानाची टक्केवारी हा कळीचा मुद्दा केंद्रस्थानी महत्त्वाची राहणार आहे.

RELATED ARTICLES

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

पंतप्रधान मोदी म्हणतात,आमच्या घरीही ईद साजरी व्हायची ! माझ्या घरी सर्व मुस्लिम कुटुंबातून जेवण यायचे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : माझ्या घराभोवती सर्व मुस्लिम कुटुंबे होती. आमच्या घरीही ईद साजरी व्हायची. इतर सणही साजरे केले जायचे. ईदच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!