Saturday, May 18, 2024
Home ताज्या बातम्या लक्ष्या-महेशची जोडी पुन्हा दिसणार ! AI च्या माध्यमातून महेश कोठारे करणार हा...

लक्ष्या-महेशची जोडी पुन्हा दिसणार ! AI च्या माध्यमातून महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठी सिनेसृष्टीतील गाजलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी. या दोघांनी जेव्हा जेव्हा सिनेमा केला तो हिटच झाला. ‘खबरदार’, ‘झपाटलेला’, ‘धडाकेबाज’, ‘धुमधडाका’ अशा अनेक सिनेमांचा यात समावेश आहे. महेश कोठारेंनी कायम आपल्या सिनेमांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक प्रयोग केले. आता त्यांना AI चा वापर करुन पुन्हा लक्ष्मीकांत बेर्डेंना स्क्रीनवर आणायचंय अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

Oplus_131072

नुकतंच महाएमटीबीला दिलेल्या मुलाखतीत महेश कोठारे म्हणाले, “लक्ष्या माझा जीवलग मित्र होता आणि अजूनही आहे. तो आजही माझ्याबरोबर आहे आणि मला तो मार्गदर्शन करतो तो माझ्याबरोबर आहे असं मला वाटतं. लक्ष्मीकांतने खूप सिनेमे केले पण त्यात लक्षात राहणारे जे चित्रपट आहेत ते माझ्यासोबतच होते. त्यामुळे आमचं गणितच वेगळं होतं. धुमधडाका, थरथराट, झपाटलेला, पछाडलेला असे बरेच होते. पछाडलेला सिनेमा त्याचा शेवटचा ठरला आणि त्याचवर्षी तो गेला.

ते पुढे म्हणाले, “मला लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर पुन्हा काम करायची इच्छा आहे. AI चा उपयोग करुन मला लक्ष्मीकांतला रिक्रिएट करायचंय आणि ते मी करणारच. लक्ष्मीकांतला मी स्क्रीनवर आणणार आहे. महेश-लक्ष्या पुन्हा एकत्र दिसणार. महेश कोठारेंचं आत्मचरित्र डॅमइट आणि बरंच काही यामध्ये त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक किस्से, लक्ष्यासोबतच्या मैत्रीबद्दल बरंच लिहिलं आहे. आता त्यांचा आगामी ‘झपाटलेला 3’ प्रदर्शित होणार आहे. 

RELATED ARTICLES

अकोल्यातील कॉंग्रेसचे साजिद खान पठाणवर गुन्हा दाखल ! मौलवींना शिवीगाळ व ॲड. आंबेडकरांना अपशब्द वापरले

अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलवी यांना शिवीगाळ करून ॲड. प्रकाश आंबेडकरांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेसचे साजिद खान पठाण यांच्यावर...

मोठी बातमी ! भाजपला 233 जागा तर एनडीएला 268 : महाराष्ट्रात NDA ला 20 जागांचा फटका ; योगेंद्र यादव यांचं भाकित

अकोला दिव्य न्युज ब्युरो : yogendra yadav prediction on bjp : सध्याच्या लोकसभा निवडणुकीच विश्लेषण करीत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी त्यांच्या...

Big News ! केजरीवालांना दिलासा : सर्वोच्च न्यायालयाकडून १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Kejariwal Interim Beail अकोला दिव्य न्युज ब्युरो: दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!