Saturday, July 27, 2024
Homeगुन्हेगारीअकोला कलेक्टर कुंभार यांचे बनावट व्हाट्सअप अकाऊंट ! खोट्या संदेशांना बळी पडू...

अकोला कलेक्टर कुंभार यांचे बनावट व्हाट्सअप अकाऊंट ! खोट्या संदेशांना बळी पडू नये ; कारवाईचे निर्देश

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला जिल्हाधिका-यांचे नाव व फोटो वापरून व्हाट्स ॲपवरील बनावट अकाऊंटद्वारे परिचित व लोकांना पैश्याची मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार +856 2098392740, तसेच +91 93329 39128 या मोबाईल क्रमांकावरून करण्यात आला आहे. तेव्हा कुणीही अशा प्रकारच्या मॅसेजवर विश्वास ठेवू नये व अशा अकाऊंटहून संदेश येताच तत्काळ याबाबत ‘रिपोर्ट’ करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुंभार यांनी केले आहे.
आधार केंद्रचालक योगेश भाटी यांना जिल्हाधिकारी कुंभार यांच्या नावे असा मेसेज प्राप्त झाला. तो बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले. याबाबत तत्काळ दखल घेऊन जिल्हाधिका-यांनी सायबर सेलला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
अशा प्रकारचे कुठलेही संदेश प्राप्त झाल्यास कुणीही बळी पडू नये. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तत्काळ कारवाई व नागरिकांना सतर्कतेबाबत भरीव जनजागृती करावी, असे आदेश सायबर सेलला देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!